---Advertisement---

Jalgaon News : ना. गुलाबराव पाटलांनी राजीनामा द्यावा, शिवसेनेकडून (उबाठा) का होतेय मागणी ?

---Advertisement---

---Advertisement---

जळगाव : सांगली जिल्हा परिषदेंतर्गत जलजीवन पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण केले. परंतु या कामाचे देयक न मिळाल्याने निर्माण झालेल्या आर्थिक तणावाला कंटाळून हर्षल पाटील या उपठेकेदाराने आत्महत्या केली. मात्र, राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी हर्षल पाटील हा उपठेकेदार होता, एवढेच वक्तव्य करत एक प्रकारे जबाबदारी झटकली. ‘हर्षल’च्या आत्महत्याप्रकरणी राज्याच्याच एका मंत्र्यांनी प्रश्न उपस्थित केला असून पाणीपुरवठा मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी शिवसेनेचे (उबाठा) उपनेते गुलाबराव वाघ यांनी केली.

शिवसेना भवन येथे झालेल्या पत्रपरिषदेत शिवसेनेचे (उबाठा) उपनेते गुलाबराव वाघ बोलत होते. ते पुढे म्हणाले की, सांगली जिल्हा परिषदेतर्फे जलजीवन अंतर्गत कामे पूर्ण केली गेली आहेत. यात सी.एस.पाटील, कदम आणि माळी असे मूळ ठेकेदार आहेत. त्यांनी कामे पूर्ण केली असली तरी राज्य सरकार दिवाळखोरीत असल्याने या ठेकेदारांनी केलेल्या कामाचे देयके थकीत आहेत. त्यामुळे मूळ ठेकेदारांनाच पैसे न मिळाल्याने त्यांच्या हाताखाली उप ठेकेदारांनी केलेल्या कामांचे पैसे मोबदला देता आलेला नाही. त्यामुळे हर्षल पाटील या सब कॉन्ट्रक्टरने आत्महत्या केली आहे.

राज्य सरकारने लाडकी बहिणसह अन्य योजनांसाठी निधी उपलब्ध केला परंतु अन्य योजनांचा पैसा उभारता आलेला नाही. त्यामुळे योजनांच्या देयकांच्या रकमा थकीत आहेत. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत इतकेच नव्हेतर कामाचे बिल मिळत नाही म्हणून कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करीत आहेत, कडे लक्ष द्यायला सरकारकडे वेळ नाही. परंतु रमी खेळण्यासह भ्रष्टाचाराला खतपाणी घालणाऱ्याना पाठीशी घालण्यासाठी सरकारला वेळ आहे.

जळगाव जिल्ह्यात किती पाणीपुरवठा योजना कामे झाली आहेत. पूर्ण झाली आहेत, अपूर्ण आहेत. याची देखील माहिती नसून खुद्द पालकमंत्री तथा पाणीपुरवठा मंत्र्यांच्याच तालुक्यात पाळधी व धरणगाव येथे आठ ते दहा दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याची दुर्दशा आहे. त्यामुळे हर्षल पाटील या उप ठेकेदाराच्या आत्महत्येसारख्या गंभीर घटनांचा निषेध करीत असून पाणीपुरवठा मंत्री यांनी राजीनामा द्यावा, अशी आमची मागणी असून आगामी काळता तीव्र आंदोलन छेडले जाणार असल्याचेही माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी यावेळी बोलतांना सांगीतले. यावेळी उबाठा गटाचे महानगर शिवसेनेचे शरद तायडे, माजी उपमहापौर कुलभूषण पाटील आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment