नंदुरबार : नंदुरबार : शेतकरी कर्ज मुक्ती घेतात आणि मिळालेल्या नुकसान भरपाईतून साखरपुडे, विवाह सोहळा करतात, असे वक्तव्य कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी नुकतेच केले. या वक्तव्याकरून नंदुबारात शिवसेना उद्धव ठाकरे गट आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, उपनगर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेत, त्यांची सुटका केलीय.
शिवसेना उद्धव बाळासोब ठाकरे पक्षाच्या वतनी कोरीट नाका परिसरात कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. यावेळी घो मंत्री कोकाटे व शासनाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. दरम्यान, उपनगर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेत, त्यांची सुटका केलीय.
अस्मानी संकटामुळे राज्यातील शेतकऱ्यांचा तोंडी आलेला घास हिसकावला गेला आहे. त्यातच काही दिवसापुर्वी अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात आर्थिक नुकसान झाले आहे. अश्या परिस्थितीत पिक विम्याची रक्कम व नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्या ऐवजी कृषीमंत्री कोकाटे यांनी शेतकऱ्यांबाबत अवमानकारक भाषा वापरली आहे.
नुकसान भरपाई रक्कम अदा करा – जिल्हाप्रमुख अरूण चौधरी
मुख्यमंत्र्यांनी तात्काळ कृषीमंत्री कोकाटे यांची मंत्री मंडळातून हकालपट्टी केली पाहिजे अथवा राजीनामा घेतला पाहिजे. अन्यथा या विरोधात शिवेसना जनआंदोलन करेल, असा ईशारा या वेळी देण्यात आला. तसेच शासनाने तात्काळ नुकसानग्रसत शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम अदा करावी, अशी मागणी जिल्हाप्रमुख अरूण चौधरी यांनी केली.
यावेळी उपजिल्हाप्रमुख अर्जुन मराठे, महानगरप्रमुख पंडित माळी,तालुकाप्रमुख रमेश पाटील, युवा सेना जिल्हा सचिव दिनेश भोपे, युवा सेना जिल्हा समन्वयक आनंदा पाटील, वाहतूक सेना जिल्हा अधिकारी धारू कोळी, वाहतूक सेना जिल्हा उपाधिकारी छोटू चौधरी, शहादा शहर प्रमुख सागर चौधरी, माजी नगरसेवक विनोद चौधरी, युवा सेना शहराधिकारी दादा कोळी, युवा सेना उपशहर अधिकारी राहुल चौधरी, युवा सेना शहर समन्वयक अक्षय श्रीखंडे, युवा सेना सोशल मीडिया प्रमुख राज पाटील, यान खाटीक, उपतालुकाप्रमुख अजय वळवी, रोहित मराठे उपस्थित होते.