Uddhav Thackeray support PM Modi : उद्धव ठाकरे लवकरच पंतप्रधान मोदींना साथ देतील ? अपक्ष आमदाराचा मोठा दावा

Uddhav Thackeray support PM Modi :  “येणाऱ्या काळात मला विश्वास आहे की विधानसभा निवडणूक होण्याआधी अहंकारी उद्धव ठाकरे हे बेचैन झाले आहेत. मोदींना कधी भेटतो, त्यांची माफी कधी मागतो आणि कधी त्यांना पाठिंबा देतो असं उद्धव ठाकरेंचं झालं आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा विसर त्यांना पडला होता. आता मातोश्रीवर त्याचं चिंतन सुरु आहे. उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत. काही लोकांच्या माध्यमांतून भाजपाशी संपर्क करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करत आहेत. विधानसभेपूर्वी एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारून पंतप्रधान नरेंद्र मोदींना ते पाठिंबा देतील. तसंच काँग्रेसह त्यांनी जी आघाडी केली आहे, राष्ट्रवादीसह जी आघाडी केली आहे त्यांना बाय-बाय करतील. ” असा दावा अपक्ष आमदार रवी राणांनी केला आहे.

 

महाविकास आघाडी सरकार असताना हनुमान चालीसा मातोश्रीसमोर म्हणणार असं आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा यांनी म्हटलं होतं. त्यावरुन बराच राडा झाला होता, ज्यानंतर या दोघांनाही तुरुंगात डांबण्यात आलं होतं. आता याच रवी राणा यांनी उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी बेचैन झाले आहेत असं म्हटलं आहे.

 

विधासनभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा देतील असा दावा एका अपक्ष आमदाराने केला आहे. एवढंच नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व उद्धव ठाकरे मान्य करतील असंही अपक्ष आमदार  रवी राणा  म्हटलं आहे.