बारसूवरुन उध्दव ठाकरेंची डबल ढोलकी; अशी आहे दुटप्पी भुमिका
मुंबई | राजापूर रिफायनरीसाठी सर्वेक्षणाला स्थानिकांकडून विरोध केला जात असून यामुळे वाद चिघळत चालला आहे. आज ठाकरे गटाचे नेते आणि प्रमुख उद्धव ठाकरे बारसूच्या दौर्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना या प्रकल्पाच्या जागेसंबधी केंद्राला उद्धव ठाकरे यांनीच पत्र दिलं होतं त्यावरून त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. यावेळी भाजपावर टीका करतांना प्रकल्पावरुन माघार घेतली नाही तर हे सरकार पडणार, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्री असताना ठाकरेंनीच बारसूची जागा सुचवली होती अशी माहिती समोर आली होती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी रिफायनरीच्या समर्थनार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहाल होतं. १२ जानेवारी २०२२ रोजी ही पत्र लिहण्यात आलं होतं. बारसूमध्ये १३ हजार एकर जमीन राज्य सरकार उपलब्ध करून देण्याची तयारी उद्धव ठाकरे यांनी दर्शवली होती. त्याचबरोबर याठिकाणची बहुतांश जमीन ही ओसाड असल्यामुळे पुनर्वसनाचा प्रश्न येणार नाही असंही या पत्रात नमूद करण्यात आलं होतं. मात्र आता उध्दव ठाकरेच या प्रकल्पाला विरोध करत आहेत.
याबाबत भुमिका स्पष्ट करतांना ठाकरे म्हणाले की, मी मुख्यमंत्री झालो तेव्हा आता जे लोक सुपार्या घेऊन फिरतात. त्या गद्दार लोकांनी मला असं सांगितलं की, हा बारसूचा प्रकल्प आता जिथे होणार अशा चर्चा आहेत. या प्रकल्पाला तिकडच्या लोकांचा विरोध नाही, तिकडे बरीच जमिन निर्मनुष्य आहे. पर्यावरणाची हानी होणार नाही. हा प्रकल्प तिकडे आला तर चांगला प्रकल्प आपल्या राज्याला मिळेल. त्याचबरोबर जो तुमचा नाणार वेळचा आक्षेप होता पर्यावरणाची हानी होईन, स्थानिकांचा विरोध येथे होणार नाही. त्यामुळे मी ते पत्र केंद्र सरकारला दिलं होतं असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं आहे.
उद्धव ठाकरे यांनी बारसू आणि सोलगाव येथील रिफायनी विरोधकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शिंदे आणि भाजवर टीका केली. नारायण राणे यांना देखील त्यांनी टोला लगावला. माझ्या काळातील प्रकल्प महाराष्ट्राल द्या. चांगले प्रकल्प राज्याबाहेर गेले, वाईट प्रकल्प राज्यात आले. रिफायनरी बारसूत आणण्यासाठी मोठ काळंबेरं आहे. महाराष्ट्राला राख आणि गुजरातला रांगोळी, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. उपर्यांची सुपारी घेऊन स्थानिकांच्या घरावर वरवंटा का फिरवता, असा सवाल देखील त्यांनी केला. प्रकल्पावरुन माघार घेतली नाही तर हे सरकार पडणार, असे उद्धव ठाकरे म्हणाले.