रामदास कदमांनी वाचला उद्धव ठाकरेंचा मालमत्तेचा पाढा

खेड : शिवसेना पक्ष आणि राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायालयात लवकरच लागणार आहे. मात्र राज्यात एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटात जोरदार शक्तीप्रदर्शन सुरू आहे. त्यातच शिंदेंना शिवसेना पक्ष चिन्हासहित मिळाल्याने त्यांची ताकद वाढली आहे. यामुळे उद्धव ठाकरे मैदानात उतरले असून कोकणातील खेड येथे त्यांनी सभा घेतली होती. या सभेला आज एकनाथ शिंदेंची उत्तर सभा होत आहे. विशेष म्हणजे ज्या मैदानावर ठाकरेंनी सभा घेतली होती, त्याच मैदानावर ही सभा आयोजित कऱण्यात आली आहे. या सभेत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता टोकाची टीका केली आहे.

रामदास कदम काय म्हणाले?

आमचे खोके काढण्यापूर्वी कुणाचे श्रीलंकेत, लंडनमध्ये हॉटेल्स आहेत. अमेरिकेत कुणाची प्रॉपर्टी आहे, हे मी काढणार आहे. एकदिवस मी राज्यासमोर हे सगळं काढणार असल्याचा इशारा रामदास कदम यांनी दिला आहे.

ते पुढे म्हणाले की, माझ्याशिवाय उद्धव ठाकरे कधीच बाहेर पडायचे नाही. मी कायम सोबत असायचो. परंतु अशी वेळ आली की त्यांनीच मला पाडण्यासाठी प्रयत्न केले. दापोलीमध्ये योगेश कदमला पाडण्यासाठी त्यांनी काम केलं. याचे पुरावे आपल्याकडे असल्याचं रामदास कदम यांनी सांगितलं.