मुंबई : उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना निशाणा केल्यानंतर आता राज्यातील काँग्रेस नेते नाराज झाले आहेत. उद्धव ठाकरेंच्या याच वक्तव्याबद्दल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी खडेबोल सुनावले आहेत. सत्ता गेली तरीही बेहत्तर पण विचारांशी तडजोड करणार नाही. राहुल गांधी आपला विचार मांडत आहेत. उद्धव ठाकरेही त्यांचे विचार मांडत आहेत. आमच्या किमान समान कार्यक्रमात सावरकर हा मुद्दा नव्हता. आम्ही सर्व धर्म समभाव या विषयावर एकत्र आलो होता. सत्ता येईल पण विचारांशी तडजोड करणार नाही, असेही नाना म्हणाले.
राहुल गांधींच्या या वक्तव्यावर आपण त्यांनाही इशारा देत असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले होते. यावरुन नाना पटोलेंसह अन्य काँग्रेस नेतेही दुखवावल्याची चर्चा आहे. उद्धव ठाकरेंनी तसे वक्तव्य करायला नको होते, अशी राज्यातील काँग्रेस नेत्यांमध्ये दबक्या आवाजच चर्चा आहे. याबद्दल सोमवार, २७ मार्च रोजी नाना पटोलेंना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. यानंतर त्यांनी कुठल्याही प्रकारचे वक्तव्य करण्याचे टाळले. मविआमध्ये सावरकर हा कळीचा मुद्दा बनू शकतो, असा इशारा त्यानी उद्धव ठाकरेंना दिला आहे.