उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ : आमचं चिन्ह आम्हालाच मिळालं पाहिजे, मशाल चिन्हावर या पार्टीने केला दावा

---Advertisement---

 

कल्‍याण : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून १७ रोजी शिवसेना पक्षचिन्हाबाबत मोठा निर्णय दिला. आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटालाच दिलं. या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. दरम्यान, त्यातच ठाकरे गटाला देण्यात आलेल्या मशाल चिन्हावर समता पार्टीने दावा केला असून ठाकरे यांच्या अडचणीत वाढत झाली आहे.

काय म्हटलंय समता पार्टीनं?
समता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय मंडळ यांनी कल्याणमध्ये पत्रकार परिषद आयोजित केली, त्यात ते म्हणाले की, शिवसेनेचा जो काही अंतर्गत वाद होता; तो आता निकालात निघाला. चिन्ह व पक्षाचे नाव हे शिंदे गटाला मिळाले. त्यामुळे आमचं चिन्ह का अडकवून ठेवलय? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. आमचं चिन्ह इतर कोणत्या पक्षाला देऊ नका. आमचं चिन्ह आम्हालाच मिळालं पाहिजे. यासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शिवसेनेचा अंतर्गत वाद सुरू असताना २०२२ मध्‍ये आम्हाला हे चिन्ह मिळाले होते. समता पार्टी ही बिहारमधील एक मोठी पार्टी आहे. मशाल चिन्हावरून समता पार्टीची ओळख आहे. निवडणूक आयोगाकडून ही चूक कशी झाली. चिन्ह घेताना शिवसेना नेत्यांना याबाबत कल्पना नव्हती का? त्यांनी जाणून-बुजून असं केलं का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

उदय मंडल यांनी आम्ही धनुष्यबाण व शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे यांना जरी मिळाला असता तरी त्यांचे देखील अभिनंदन केलं असते. आम्हाला शिवसेनेच्या अंतर्गत वादाशी काही देणंघेणं नाही. आम्हाला आमचं मशाल हे चिन्ह हवंय त्यासाठी आम्ही सुप्रीम कोर्टात धाव घेणार असल्याचे स्पष्ट केले.

तसेच काही जणांना मुख्यमंत्री पुढे करतात. या आरोपाला उत्तर देताना उदय मंडल यांनी संजय राऊत यांच्या जवळ तर काही सोडलं नाही. खोके देखील नाही असा मिश्किल टोला लगावला. त्यांच्याकडून मुख्यमंत्र्यांचे खुर्ची एकनाथ शिंदे घेऊन गेले पार्टी घेऊन गेले. चिन्ह देखील घेऊन गेले तरी हे पाहत राहिले. यांच्याकडे काही उरल नाही; तर दुसऱ्याकडे बोटं दाखवतात समता पार्टीकडे बोटं दाखवतात त्यांच्याकडे काहीच उरलं नाही असा टोला लगावला. यावेळी उदय मंडल यांनी एकनाथ शिंदे यांचे धनुष्यबाण हे चिन्ह मिळाल्याबद्दल अभिनंदन केले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---