---Advertisement---
Ujjwal Nikam : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ज्येष्ठ वकील उज्ज्वल देवराव निकम, माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला, इतिहासकार मीना कुमारी जैन आणि सामाजिक कार्यकर्त्या सी. सदानंदन मास्टर यांची राज्यसभेसाठी नियुक्ती केली आहे. या नियुक्तीनंतर उज्ज्वल निकम राज्यसभेत पोहोचले आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रपती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उज्ज्वल निकम यांच्या नामांकनावर आनंद व्यक्त केला आणि म्हणाले, “उज्ज्वल निकम सारख्या व्यक्तिमत्त्वाला राज्यसभेत पाठवल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आभार मानतो. दहशतवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित प्रकरणांमध्ये विशेष सरकारी वकील म्हणून त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे. पंतप्रधान मोदी नेहमीच राष्ट्रवादींच्या पाठीशी उभे राहतात. न्यायालयापासून संसदेपर्यंतच्या या प्रवासासाठी मी त्यांचे अभिनंदन करतो.”
कोण आहेत उज्ज्वल निकम ?
उज्ज्वल निकम हे देशातील सर्वात प्रसिद्ध सरकारी वकीलांपैकी एक मानले जातात. २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या खटल्यासह अनेक हाय-प्रोफाइल फौजदारी खटल्यांमध्ये त्यांनी विशेष सरकारी वकीलाची भूमिका बजावली आहे.
खासदार होण्याचे स्वप्न अखेर पूर्ण
२०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांना भाजपने मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती, मात्र त्यांना काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. परंतु आता या घोषणेमुळे त्यांचे खासदार होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.