दुखापतीमुळे टीम इंडियात बदल, AUS मालिकेत ‘या’ खेळाडूची एन्ट्री

#image_title

भारतीय महिला क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलियन संघ यांच्यात ५ डिसेंबरपासून ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. मात्र या मालिकेपूर्वी दुखापतींमुळे भारतीय संघात बदल करावे लागले. दुखापतग्रस्त यस्तिका भाटियाच्या जागी एका युवा यष्टीरक्षकाचा टीम इंडियाच्या संघात समावेश करण्यात आला आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) एका निवेदनात म्हटले आहे की, ‘अखिल भारतीय महिला निवड समितीने जखमी भाटियाच्या जागी उमा छेत्रीचा समावेश केला आहे. यास्तिका अधिक अनुभवी आहे, तिने तीन कसोटी, 28 एकदिवसीय आणि 19 टी-20 सामने खेळले आहेत. या मालिकेतील पहिला सामना 5 डिसेंबरला आणि दुसरा सामना 8 डिसेंबरला ब्रिस्बेनमध्ये होणार आहे. यानंतर तिसरा आणि शेवटचा वनडे 11 डिसेंबर रोजी पर्थमधील वाका मैदानावर खेळवला जाईल.

भारतीय विकेटकीपर फलंदाज यास्तिका भाटिया महिला बिग बॅश लीग 2024 दरम्यान जखमी झाली होती. मेलबर्न स्टार्सकडून खेळताना तिच्या मनगटाला दुखापत झाली. तिच्या मनगटात एक लहान फ्रॅक्चर आहे, ज्यामुळे तिला महिला बिग बॅश लीग 2024 मधून बाहेर पडावे लागले.

याआधी न्यूझीलंडविरुद्धच्या होम वनडे मालिकेदरम्यान त्याला गुडघ्याच्या दुखापतीमुळे पाच महिने मैदानाबाहेर राहावे लागले होते. ऑस्ट्रेलिया मालिका ही तिच्या पुनरागमनानंतरची पहिली मालिका होती, पण ती यातूनही बाहेर पडली.

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), प्रिया पुनिया, जेमिमाह रॉड्रिग्स, हरलीन देओल, ऋचा घोष (यष्टीरक्षक), तेजल हसबनीस, दीप्ती शर्मा, मीनू मणी, प्रिया मिश्रा, राधा यादव, तीतस साधू, अरुंधती, रेड्डी. रेणुका सिंग ठाकूर, सायमा ठाकूर, उमा छेत्री (यष्टीरक्षक).