विधानसभेला उमेदवारी हवी, तर लोकसभेला मोठी लीड द्या

मुंबई : लोकसभा निवडणुकीत राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत आहे. महाराष्ट्रातून महायुतीच्या ४५ जागा निवडून आणण्याचे उद्दिष्ठ भाजपाने घेतले आहे. यात राज्यातील प्रमुख नेते व आमदारांवर मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ज्यांना आमदारकीचं तिकिट हवं असेल, त्यांनी लोकसभेला आपल्या विधानसभा मतदारसंघातून मोठी लीड देणं बंधनकारक आहे, असं भाजपच्या राज्यातील प्रमुख नेत्यांनी सुचित केले आहे.

महायुतीने ‘मिशन ४५ प्लस’ अत्यंत गांभीर्याने घेतलं आहे. त्यासाठी भाजपचे वरिष्ठ नेते कामाला लागले असून राज्यस्तरीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनाही टार्गेट देण्यात आली आहेत. त्यानुसार प्रत्येकाचं रिपोर्ट कार्डच तयार केलं जाणार आहे. त्यांच्या मताधिक्याचा उमेदवाराला कसा फायदा झाला, याचं मूल्यमापन होणार आहे.

भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी विधानसभा आमदार आणि इच्छुक उमेदवारांना सूचना दिल्या आहेत. त्यामुळे पुन्हा आमदारकीचं स्वप्न पाहायचं असेल, तर आतापासूनच जोमाने कामाला सुरुवात करावी लागेल. विधानसभेची उमेदवारी हवी असेल, त्यांनी लोकसभेला आपल्या विधानसभा क्षेत्रातून संबंधित उमेदवाराला मोठं मताधिक्य देणं बंधनकारक आहे.