---Advertisement---

अंघोळीसाठी गेले अन् झाला घात, तापी नदीपात्रात बुडून मामा-भाच्याचा दुर्दैवी मृत्यू

---Advertisement---

जळगाव : अंघोळीसाठी गेलेल्या मामा-भाच्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना बुधवारी (२१ मे) रोजी सकाळी ८ वाजता भुसावळ येथील राहुल नगर भागातील तापी नदीपात्रात घडली. रामराजे नंदलाल नातेकर (५५) व आर्यन नितीन काळे ( २१, दोन्ही रा. जालना) असे मृतांची नावे आहे. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जालना येथील रामराजे नंदलाल नातेकर (५५) व आर्यन नितीन काळे (२१) दोघे मामा-भाचा भुसावळ शहरातील पेंढारवाडा भागात देवाच्या कार्यक्रमानिमित्त आले होते.बुधवारी (२१ मे) रोजी सकाळी ८ राहुल नगर भागातील तापी नदीपात्रात दोघे अंघोळीसाठी गेले होते. त्यांना पाण्याच्या अंदाज न आल्याने दोघांचा बुडून मृत्यु झाला.

घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी धाव घेत, त्यांना भुसावळ ट्रॉमा सेंटर येथे दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून दोघांना मृत घोषित केले. रामराजे नातेकर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. तर आर्यन काळे याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

विवाहिता दुचाकीवरून उतरली अन् झालं होत्याचं नव्हतं, नेमकं काय घडलं?

जळगाव : जळगाव जिल्हयात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या २० वर्षीय विवाहितेने विहिरीत उडी घेत आयुष्य संपवल्याची घटना उघडकीस आली आहे. मुस्कान अल्ताफ तडवी (20) असे मृत विवाहितेचे नाव आहे. दरम्यान, ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा आरोप मृत विवाहितेच्या नातेवाईकांनी केला आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment