तरुण भारत लाईव्ह । ८ मे २०२३। छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चेंबरमध्ये पडून दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना नेमकी कशी घडली याची माहिती अद्याप समोर आली नाही. पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरु आहे.
सूत्रानुसार, छत्रपती संभाजीनगर शहरातील गुलाब गार्डनसमोरील चेंबरमध्ये सोमवारी चार तरुण पडले. या दुर्घटनेमध्ये दोन तरुणांचा मृत्यू झाला. अंकुश थोरात आणि रावसाहेब घोरपडे असे मृत तरुणाचे नाव आहे. तर विष्णू उगले आणि आणखी एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. या दोन्ही तरुणांना चेंबरबाहेर काढून घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
यामधील विष्णू उगलेची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर घाटी रुग्णालयातल्या मेडीसिन विभागात आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. हे तरुण चेंबरमध्ये कसे पडले याची माहिती समोर आली नाही. दरम्यान, संभाजीनगर पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.