युनियन बँकेत ग्रॅज्युएट्स पाससाठी 1500 जागांवर भरती; पगार 85,920 मिळेल

तुम्हीही पदवी पास असाल आणि सरकारी बँकेत नोकरी शोधात असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. युनियन बँक ऑफ इंडियाने तब्ब्ल 1500 जागांवर भरतीची अधिसूचना निघाली असून या भरतीसाठी आज म्हणजेच 24 ऑक्टोबरपासून अर्ज प्रक्रिया सुरु झालीय. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 नोव्हेंबर 2024 आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालवता त्वरित अर्ज करावा.

या पदांसाठी होणार भरती?
ही भरती स्थानिक बँक अधिकारी (LBO) या पदांसाठी होणार आहे. या भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवी पास असावा.
इतका मिळेल पगार: या भरतीसाठी पात्र उमेदवारांना दरमहा 48,480-2000/7-62,480-2340/2-67,160-26,80/7-85,920/- पर्यंत पगार मिळेल.

वयश्रेणी : 01 ऑक्टोबर 2024 रोजी 20 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹850/- [SC/ST/PWD:₹175/-]