वैश्विक कल्याणासाठी वैश्विक विज्ञान !

प्रासंगिक

– प्रा. आरती तिवारी

Photon-electron १९२२ साली सर सी. व्ही. रमण जहाजाने लंडनहून परत येत होते. Photon-electron रोजच जहाजाच्या डेकवरून निळे आकाश आणि निळे समुद्राचे पाणी पाहत असताना, प्रवासाच्या १५ व्या दिवशी क्षितिजावर रोजच दिसणा-या गडद निळ्या-जांभळ्या रंगाने त्यांच्या संशोधक बुद्धीला आकर्षित केले व आव्हान दिले. Sir Rayleigh ने सांगितल्याप्रमाणे, Photon-electron collision निळा रंग सर्वात जास्त (scattered) विसरित होतो, म्हणून आकाश निळे दिसते Photon-electron व त्याचे प्रतिबिंब म्हणून पाणी निळे दिसते तर मग क्षितिजावर गडद निळा जांभळा रंग का दिसतो?

Photon-electron सहा वर्षांच्या विविध प्रयोगांवरून त्यांनी सिद्धांत मांडला की, Photon-electron elastic collision मुळे ज्या तरंग लांबीचा फोटॉन इलेक्ट्रॉनवर आदळतो, त्याच तरंग लांबीचा प्रकाश उत्सर्जित होतो. पण त्यामधील काही Collisions ho inelastic असतात म्हणून वेगळ्या तरंग लांबीचा प्रकाश पण उत्सर्जित होतो. Photon-electron हाच तो प्रसिद्ध रमण इफेक्ट; जो २८ फेब्रुवारी १९२८ रोजी सर सी. व्ही. रमण यांनी प्रकाशित केला आणि त्यांना १९३० साली नोबेल पारितोषिकाने गौरविण्यात आले. आज याच सिद्धांतावर आधारित रमण स्पेक्ट्रोस्कोपीचा उपयोग रसायनशास्त्रात रेणूंची रचना, रेणूंमधील बंधन अभ्यासण्यासाठी होतो. भौतिकशास्त्रात पदार्थाचे स्फटिकरूप शोधण्याकरिता, Plasmaons, magnons, superconducting gap detection _Ü`o hmoVmo. Nanotechnologyमध्ये होतो. छरपेींशलहपेश्रेसू मध्ये सूक्ष्मतारांचे विश्लेषण करण्यासाठी, फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये अ‍ॅक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट शोधण्यासाठी केला जातो. Photon-electron जीवशास्त्र आणि वैद्यकशास्त्रातसुद्धा पेशी रचनेचा अभ्यास करण्यासाठी रमण स्पेक्ट्रोस्कोपी वापरली जाते.

Photon-electron प्राचीन सांस्कृतिक वारसा सांगणा-या चित्रांमधील -हास होणा-या रंगद्रव्यांचा अभ्यास करण्यासाठी, मूळ प्रतीला हानी न पोहोचविता प्राचीन हस्तलिखित वाङ्मयातील कागद, शाईचे रंगद्रव्य अभ्यासण्यासाठी रमण स्पेस्ट्रोस्कोपी वापरली जाते. Photon-electron विज्ञानामध्ये दररोज नवीन नवीन शोध लागत असतात. त्याचे फायदे-तोटे समाजाला होत असतात. त्याकरिता समाजामध्ये जागरूकता तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याच्या हेतूने राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाद्वारे दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो. Photon-electron या दिवशी विज्ञानाचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ आणि वेगवेगळ्या संस्था विविध व्याख्यान, चर्चा आयोजित करतात, विज्ञान प्रदर्शनांचे आयोजन केले जाते. मासिकात, वर्तमानपत्रात लेख लिहिले जातात. Photon-electron या दिनाची यावर्षीची मध्यवर्ती संकल्पना आहे वैश्विक कल्याणासाठी वैश्विक विज्ञान (Global Science for Global well being)

Photon-electron आज संपूर्ण विश्वासमोर दोन प्रमुख आव्हाने आहेत. पहिले अर्थातच पर्यावरणाचा èहास आणि दुसरे मानवतेचा दुष्काळ. या दोन्हींचे समाधान आहे भारतीय विज्ञानाधारित जीवनशैलीमध्ये. गरज आहे ती जागरूकता निर्माण करण्याची आणि दृष्टिकोन विकसित करण्याची. कोरोना महामारीत हे सिद्ध झाले आहे. लोकसंख्येच्या अनुपातामध्ये इतर देशांच्या तुलनेत आपण मृत्युदर कमी राखण्यात यशस्वी झालो. Photon-electron देशातील १०० कोटींपेक्षा जास्त जनतेचे लसीकरण झाले. १०० पेक्षा जास्त देशांना कोरोना लस वेळेत पुरवली. कोरोना काळात एक वर्ष सर्व वाहतूक आणि कारखाने बंद होते, त्या काळात पर्यावरणाचा दर्जा सुधारला. पण जनजीवन पूर्वपदावर येताच पुन्हा प्रदूषणाचा विळखा वाढला. म्हणजेच पर्यावरणाच्या -हासाचे मुख्य कारण मानव आहे. Photon-electron आज पर्यावरणाचा -हास अगदी त्याच्या शिखरावर आहे; अगदी थोड्या-अधिक पावसाने लगेच पूर-महापूर येतात आणि त्याच वर्षी त्याच भागात उन्हाळ्यात दुष्काळ पडतो. पाणी जमिनीत मुरण्याचे प्रमाण नगण्य झाले आहे. Photon-electron कारण मातीमध्ये पाणी झिरपण्याची, मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी झालेली आहे. खूप मोठ्या प्रमाणात रासायनिक खते आणि कीटकनाशक यामुळे मातीचा -हास तर झालाच आहे; कर्करोगाचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे आज सेंद्रिय शेतीचे महत्त्व सगळ्यांच्या लक्षात आले आहे.

युनोने २०२३ हे वर्ष Millet yearम्हणून घोषित करण्यात भारताची प्रमुख भूमिका होती. एकूण ११ भरड धान्यांपैकी नऊ धान्ये भारतात पिकतात. अगदी कमी पाण्यात, थोड्या खडकाळ मातीत पण त्यांचे उत्पादन होऊ शकते. तसेच गव्हापेक्षा कितीतरी पट अधिक पौष्टिकता या धान्यामध्ये आहे. Photon-electron त्यांचा आहारामध्ये समावेश केला तर मधुमेह आणि लठ्ठपणा आटोक्यात राहतो. आहाराबाबतीत वैश्विक जागरूकता आली तर भारताची धान्य निर्यात वाढेल. या धान्यांना ‘श्री धान्यङ्क म्हणून संबोधण्यात येते. Photon-electron पेट्रोलियमसाठी होणारे देशांतर्गत वाद आणि कुरघोडी, पेट्रोलियमच्या अतिवापरामुळे होणारे प्रदूषण यावर २०१८ च्या उजझ-२६ परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपाय सांगितला. One Sun- One Earth- One Grid. संपूर्ण पृथ्वीवर मिळून २४ तास सौरऊर्जा निरंतर उपलब्ध आहेत; जी पर्यावरण पूरक, मोफत आणि मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. तेव्हा जर जगातील सर्वच देश, एका frequency वर चालणा-या एका grid ने जोडले गेले तर ऊर्जा टंचाईची समस्याच राहणार नाही आणि जीवाश्म इंधनच्या ज्वलनामुळे होणा-या प्रदूषणाची समस्यासुद्धा सुटेल.

Photon-electron हे आहे वैश्विक कल्याणासाठी वैश्विक विज्ञान ! निरोगी राहण्यासाठी योगाचे महत्त्व पटवून, १०० पेक्षा जास्त देशांना vaccine पुरवून, One Earth, One Grid ची संकल्पना देऊन आहाराविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी Millet Yearशीं धशरी घोषित करून भारताचे विज्ञान वैश्विक कल्याणाकरिता आहे. वैश्विक विज्ञानाचे नेतृत्व करण्यास भारत सक्षम आहे, हे आपण जगाला दाखवून दिले. Photon-electron स्वार्थी वृत्ती, सकारात्मक मानसिकतेचा अभाव, राजकीय महत्त्वाकांक्षा केवळ व्यापाराच्या भरवशावर आर्थिक महासत्ता होण्यासाठी देशादेशांमधील संघर्ष यामुळे वैश्विक मानवतेचा स्तर खालावला आहे. सर्वच देश एकमेकांना युद्धादरम्यान अण्वस्त्रांचा धाक दाखवत असतात. Photon-electron एका क्षणात संपूर्ण पृथ्वीचा विनाश होईल इतक्या क्षमतेची अण्वस्त्रे काही देशांकडे आहेत. अशाप्रकारे संपूर्ण पृथ्वीच विनाशाच्या उंबरठ्यावर उभी आहे. विज्ञानाच्या प्रगतीबरोबरच तंत्रज्ञान ज्या वेगाने विकसित झाले, त्या वेगाने त्या तंत्रज्ञान वापरण्यास लागणारी समज विकसित झाली नाही, Photon-electron म्हणून मोबाईलच्या अतिवापरामुळे निर्माण झालेल्या शारीरिक, मानसिक व सामाजिक समस्या दिसून येत आहेत. अमेरिकेमध्ये तर विद्यार्थ्यांच्या स्कूल बॅगमध्ये

Photon-electron स्वसंरक्षणाच्या नावाखाली रिव्हॉल्वर असते (open gun law) आणि त्याचा ते बेताल वापर करीत असतात. सोशल मीडियावर सर्वच प्रकारचे ज्ञान, काही मानवाला विकासाकडे तर काही विध्वंसाकडे नेणारे एका लश्रळलज्ञ वर उपलब्ध आहे. बंदूक किंवा बॉम्ब कसा तयार करावा, याचीसुद्धा माहिती सोशल मीडियामध्ये मिळते. स्वैराचाराने वागून स्वतःचा, समाजाचा आणि पृथ्वीचा -हास करायचा की नराचा नारायण व्हायचे, ही विवेक बुद्धी निर्माण करणे, हेच आज आपल्यासमोर मोठे आव्हान आहे. Photon-electron आज समाजामध्ये विज्ञान आणि अध्यात्म वेगवेगळे मानले जातात. वेद, उपनिषद, दर्शनशास्त्राचे अध्ययन केवळ आध्यात्मिक उन्नतीसाठी केले जाते. त्यातील विज्ञानापासून सर्वसामान्य माणूस अजून दूरच आहे. खरं तर संपूर्ण विश्वच विज्ञानमय आहे. एक मानवी शरीर, त्याचा अभ्यास जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, आहारशास्त्र, वैद्यकशास्त्र, मानसशास्त्र समाजशास्त्र, राज्यशास्त्र अशा कितीतरी वेगवेगळ्या अनुषंगाने केला जातो. Photon-electron ‘विशिष्ट ज्ञानं इति विज्ञानम’ कुठल्याही बाबीचे विशेष ज्ञान म्हणजे विज्ञान! दर्शनशास्त्र, वेद, उपनिषदांमध्ये जलविद्या, अग्निविद्या, कृषिविद्या, वैद्यकशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, राज्यशास्त्र यांचे विज्ञान दर्शवणा-या ऋचा आहेत. सृष्टीची निर्मिती तसेच जीव चैतन्याचा विकास सांगणारे सूक्त आहेत. Photon-electron आपण म्हणतो, वेद अपौरुषेय आहेत. त्याकाळी ज्या ज्या ऋषिमुनींना जे जे ज्ञान सुचले ते ते त्यांनी वेदांमधील सूक्तात समाविष्ट केले. ‘इदं न मम’ या भावनेने सर्व रचयितांनी त्याचे श्रेय ईश्वराला समर्पित केले म्हणून वेद अपौरुषेय आहेत.

Photon-electron वैद्यकशास्त्र, दर्शनशास्त्र लिहिणारे आमचे ऋषिमुनी थोर वैज्ञानिक होते. उत्तम राज्य कसे करावे हे विदुरनीती, चाणक्यनीती सांगते. मन आणि इंद्रियांना काबूत ठेवून आत्मसंयम कसा साधावा, शांत समाधानी, नि:श्रेयस आणि अभ्युदय जीवन जगण्याचे विज्ञान सांगणारे हे सर्व संत थोर तत्त्वज्ञानी होते. Scientists म्हटला की सूटबूट घातलेला शास्त्रज्ञ आणि त्यांनी सांगितलेले ज्ञान म्हणजेच विज्ञान, अशी काहीशी मानसिकता आपली झालेली दिसते. ऋषिमुनींनी, संतांनी सांगितलेल्या विज्ञान, तत्त्वज्ञानाला धार्मिकतेच्या चष्म्यातून का पाहिले जाते? Photon-electron त्यांच्या विज्ञानाचा अभ्यासक्रमात समावेश करण्यास आपण का आक्षेप घेतो? ‘आ नो: भद्रा: क्रतवो यन्तु विश्वत:’ सर्व बाजूंनी आमच्यापर्यंत कल्याणकारी विचार यावेत आणि आम्ही त्याचा स्वीकार करावा. आज भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर एक प्रमुख प्रभावी स्थान निर्माण केले आहे. भारतीय विज्ञान, तत्त्वज्ञान, मनोविज्ञान स्वीकारून निरामय, निरोगी, शांत, समाधानी व समृद्ध मानवी जीवन जगू शकतो, असा विश्वास जागतिक स्तरावर निर्माण करण्यासाठी आपण कटिबद्ध होऊयात. स्वामी विवेकानंदांनी शिकागो परिषदेत या विश्वासाचा पाया सव्वाशे वर्षांपूर्वी रोवला आहे. आपल्याला त्यावर इमारत बांधायची आहे. ‘ज्ञानं विज्ञानसहितं यज्ज्ञात्वा मोक्ष्स्ये शुभात्” इति श्री भगवानुवाच…!

९८६०१७६९९९