मुंबई-पुणे विद्यापीठाला लाभणार नवे कुलगुरू

तरुण भारत लाईव्ह । मुंबई : मुंबई विद्यापीठ कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांचा कुलगुरूपदाचा कार्यकाळ 10 सप्टेंबर 2022 रोजी संपले होता. त्यामुळे तेव्हापासून हे पद रिक्त होते. कोल्हापूरमधील शिवाजी विद्यापीठ कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्याकडे मुंबई विद्यापीठ कुलगुरूचा पदाचा अतिरिक्त कार्यभार (प्रभारी) दिला गेला होता. दरम्यान राज्यातल्या विद्यापीठांमध्ये कुलगुरू बदलांची चर्चा आहे. मुंबईआणि पुणे विद्यापीठाला आता नवे कुलगुरू मिळणार आहेत.

कुलगुरू निवड समितीने मागील आठवड्यातच मुंबई विद्यापीठ आणि त्यापूर्वी पुणे विद्यापीठाच्या मुलाखती घेतल्या होत्या. यानंतर काही संभाव्य नावे राज्यपालांकडे पाठवण्यात आली होती. मागील काही काळापासून दोन्ही विद्यापीठांचे कुलगुरूपद रिक्त होते. प्राध्यापक संघटनेकडून चर्चेत असलेल्या नावांवर निवडीआधीच विरोध दर्शवला गेला. यामुळे कुलगुरूपद मिळतं याकडे लक्ष लागलं आहे.

मुंबई विद्यापीठ कुलगुरू नियु्क्तीच्या सुरू झालेल्या प्रक्रियेमध्ये ८० जणांनी सहभाग नोंदवला होता. यातील २० जणांच्या मुलाखती पार पडल्या. निवड समितीने या मुलाखती मागील आठवड्यात घेतल्या. यानंतर एकूण पाच नावे, राज्यपलांकडे पाठवण्यात आली आहेत. या पाच नावांपैकी एका नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. यापैकी एकाची राज्यपाल म्हणून निवड करतील.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठीय कुलगुरू निवड समितीन यांनी तब्बल २७ इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत. आता या २७ पैकी ५ नावे अंतिमत: निश्चित करून ती राज्यपाल कार्यालयाकडे पाठवण्यात आली आहेत.

 

पुणे विद्यापीठाची संभावित नाव :

डॉ. पराग काळकर – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता

प्रा. अविनाश कुंभार – विद्यापीठातील रसायनशास्त्र विभाग

डॉ.संजय ढोले – भौतिकशास्त्र विभाग

प्रा. सुरेश गोसावी – पर्यावरण शास्त्र विभाग

डॉ. विजय फुलारी – कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभाग

 

मुंबई विद्यापीठ कुलगुरूसाठी संभावित नाव :

प्रा. रवींद्र कुलकर्णी – मुंबई विद्यापीठाची माजी प्र कुलगुरू म्हणून यांनी काम केला आहे

सुरेश गोसावी – भौतिक शास्त्राचे प्राध्यापक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

तेज प्रताप सिंग – बीएचयु ( बनारस हिंदू विद्यापीठ), राज्यशास्त्राचे प्राध्यापक

ज्योती जाधव – शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर बायोटेक्नॉलॉजी डिपार्टमेंट

अर्चना शर्मा – भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर