– डॉ. छाया नाईक
९ ऑगस्ट १९८२ रोजी संयुक्त राष्ट्र संघाने जिनेव्हा येथे आदिवासी लोकांच्या हितरक्षणासाठी एक बैठक आयोजित केली होती. १९९४ च्या डिसेंबरमध्ये संयुक्त राष्ट्र संघात आदिवासी लोकांवर होणाèया अत्याचारावर सविस्तर चर्चा झाली. त्याच बैठकीत निर्णय घेण्यात आला की, दरवर्षी ९ ऑगस्ट हा दिवस विश्व मूलनिवासी दिवस म्हणून साजरा करण्यात यावा व प्रत्येक देशातील आदिवासींच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. world’s indigenous peoples day त्यामुळे ९ ऑगस्ट १९९५ पासून हा दिवस विश्व मूलनिवासी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.
भारतीय इतिहासाचे विकृतीकरण आणि आम्ही
भारतीय इतिहासाचे लेखन करणा-यात लॉर्ड मेकॉले हा शिक्षणतज्ज्ञ महत्त्वाची भूमिका बजावताना दिसतो. भारतीयांना शिक्षण द्यायचे ते त्यांच्या विकासासाठी व पर्यायाने भारताच्या उत्थानासाठी असे त्याला कधीच वाटत नव्हते. world’s indigenous peoples day १८३० ते १८४० या सुमारास भारतातील शिक्षण संस्था बंद करून इंग्रजी शिक्षण देणा-या संस्था त्याने सुरू केल्या. या शाळांमधून शिक्षण घेतलेल्या काळ्या इंग्रजी मेकॉले पुत्रांनी भारतीय संस्कृतीशी पूर्णपणे फारकत तर घेतलीच; पण भारतीय समाज हा जुनाट, भिकारडा, अडाणी, सतत पराभूत होणारा, जातिभेदाने पोखरलेला असून इंग्रजी राज्य हे आपल्यासाठी वरदान आहे, असा समज जनमानसात दृढ करणा-या पिढ्यांमागून पिढ्या तयार केल्या. world’s indigenous peoples day अजूनही या बुद्धिभ्रमातून आपले उच्चविद्याविभूषित बाहेर पडलेले नाहीत.
मेकॉलेला साथ मिळाली ती मॅक्समुल्लर या जर्मन विद्वानाची. त्याने वेदांचे आणि उपनिषदांचे भाषांतर केलेले असल्यामुळे त्याची विद्वत्ता वादातीत होती. भारतावर राजकीय गुलामगिरी लादल्यावर धार्मिक आणि सांस्कृतिक गुलामगिरी लादणे, येथे दीर्घकाळ राज्य करण्यासाठी आवश्यक होते. world’s indigenous peoples day त्यासाठी तोपर्यंत प्रचारात आलेला भारतावर झालेल्या आर्यांच्या आक्रमणाच्या सिद्धांताची म्हणजे आर्यन इन्व्हेजन थिअरीची त्यांना मदत झाली. कोणताही वैज्ञानिक किंवा शास्त्रीय पुरावा नसलेल्या या सिद्धांताच्या मदतीने इंग्रजांनी येथील समाजात फूट पाडायला सुरुवात केली. एच. एच. विल्सन नावाच्या इंग्रज विद्वानाने स्पष्टच सांगितले की, भारतीय समाजाला सुसंस्कृत करण्यासाठी भारतातील सर्व समाजाचे ख्रिश्चनीकरण करायचे, असे ठरवल्यावर त्यांनी त्या दृष्टीने पाऊले टाकायला सुरुवात केली. दक्षिण भारतात त्यांनी अपप्रचार सुरू केला की, आर्यांनी तुमच्या द्रविड संस्कृतीचा नाश करून तुमच्यावर वेदिक धर्म लादला आहे. world’s indigenous peoples day तो सोडून ख्रिश्चन व्हा. त्यातच तुमचे कल्याण आहे. गोवा आणि दक्षिण भारतात आजही त्याचे दुष्परिणाम आपल्याला दिसत आहेत.
आदिवासी म्हणजे काय?
युरोपियन वसाहतवाद्यांनी इसवी सनाच्या १३ व्या शतकापासून आपली मोठाली जहाजे घेऊन व्यापाराच्या मिषाने जगभर भ्रमंती सुरू केली. आफ्रिकेतील लोकांना शस्त्रास्त्रांच्या जोरावर कैद करून गो-या लोकांच्या घरी व शेतावर आणि कारखान्यांमध्ये राबण्यासाठी गुलाम म्हणून त्यांची विक्री सुरू केली. world’s indigenous peoples day त्याच बरोबर अमेरिकेतील मूळ निवासी लोकांना ज्यांना ते इंडियन्स म्हणत व आपण रेड इंडियन्स म्हणून ओळखतो, त्यांचा नरसंहार करून तेथील जमिनी ताब्यात घ्यायला सुरुवात केली. ऑस्ट्रेलियातील मूळ निवासी लोकांना ज्यांना ते अबोरिजिनल म्हणत, त्यांचाही त्यांनी नरसंहार केला. तेथील साधन संपत्तीवर अधिकार मिळवून तिची लूट करणे, हाच त्यांचा मुख्य उद्देश होता. world’s indigenous peoples day आज अमेरिका व ऑस्ट्रेलियात हे मूळ निवासी लोक जवळजवळ नामशेष होत आले आहेत. जे आहेत त्यांची त्यांच्या मूळ संस्कृतीपासून पूर्णपणे फारकत झालेली आहे.<
आपल्याकडे अशी स्थिती आहे का?
प्राचीन भारतात येथील समाजाचे नगरवासी, ग्रामवासी व वनवासी असे तीन भाग होते. शहरात राहणारे ते नगरवासी, खेड्यांमध्ये राहणारे ते ग्रामवासी व जंगलांमध्ये राहणारे ते वनवासी. आपली खेडी जशी स्वयंपूर्ण होती तसेच वनांमध्ये राहणारा वनवासी समाज हासुद्धा स्वयंपूर्ण होता. world’s indigenous peoples day जंगलात मिळणा-या नैसर्गिक साधनसंपत्तीची लूट न करता तिचे रक्षण करून व दोहन करून जगत होता. आपल्या वनांचे व तेथील नैसर्गिक साधन संपत्तीचे रक्षण करीत होता. अनेक शूरवीर, योद्धे, राजे आणि राण्या अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आपल्या वनातील राज्याचा शकट हाकीत होते. नागपूर आणि त्याच्या सभोवतालच्या भागावर शासन करणारे गोंड राजे हे याच समाजाचे!
येथील ग्रामवासी किंवा नगरवासी राजांनी या वनवासी लोकांवर आक्रमण करून त्यांचा वंशविच्छेद केल्याचा इतिहास नाही. या समाजावर खरे अत्याचार केले ते साम्राज्यवादी आणि वसाहतवादी इंग्रजांनी आणि युरोपियन्स लोकांनी. पण ऑस्ट्रेलिया किंवा अमेरिकेसारख्या पाश्चात्त्य देशांमध्ये तेथील आदिवासी लोकांचा जो नरसंहार या लोकांनी केला, त्यांचा वंशविच्छेद करण्याच्या योजना त्यांनी क्रियान्वित केल्या; त्या क्रौर्याला मात्र जागतिक इतिहासात तोड नाही. world’s indigenous peoples day या आपल्या दुष्कृत्यांचे परिमार्जन करण्यासाठी किंवा आम्हीच खरे मानवतावादी आहोत, हे जगाला सांगण्यासाठी त्यांनी ९ ऑगस्ट हा दिवस जागतिक मूलनिवासी दिन म्हणून साजरा करावा असे फर्मान काढले. जगभरात आदिवासी किंवा मूलनिवासी लोकांवर झालेले हे अत्याचार, त्यांचा नरसंहार लक्षात घेता ९ ऑगस्ट हा दिवस हर्षोल्लासाने साजरा करायचा नाही तर वसाहतवाद्यांनी आपल्या वसाहती स्थापन करण्यासाठी स्थानिक लोकांवर केलेल्या अत्याचाराच्या, त्यांच्या नरसंहाराच्या इतिहासाला साक्ष ठेऊन बळी पडलेल्या मूलनिवासी लोकांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा आहे.
आपण सर्वच जण भारतातील मूलनिवासी किंवा आदिवासीच आहोत. आपल्यापैकी जे लोक वनात राहत होते त्यांना आता जनजाती अशी ओळख आहे. त्यांच्या जल, जमीन व जंगलातील अधिकारांसाठी सध्याच्या सरकारने कायदे केलेले आहेत. त्यांच्यासाठी जो दिवस आनंदाने साजरा करायचा तो एखाद्या जनजाती समाजाचा गौरव वाढविणाèया नेत्याचा जन्मदिवस असावा, असा विचार पुढे येत आहे. त्यादृष्टीने बिरसा मुंडा यांची जयंती १५ नोव्हेंबरला साजरी करावी. त्यात सर्वांनी आनंदाने सहभागी होऊन एकात्म भारतीय समाजाचा सर्व जगाला परिचय द्यावा, असे वाटते. असे केले तरच तो ख-या अर्थाने जनजाती गौरव ठरेल.
९८९०००२२८२