MLA Lata Sonwane । उनपदेव तीर्थक्षेत्राचा होणार कायापालट; आमदार सोनवणेंनी आणला ‘इतक्या’ कोटींचा निधी

विजय सोळंके
अडावद, ता. चोपडा : आमदार लता सोनवणे व माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या चोपडा विधानसभा मतदारसंघातील तीर्थक्षेत्र तथा पर्यटन केंद्र उनपदेवचा विकास होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी आमदार लता सोनवणे व माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे हे सातत्याने प्रयत्न करत होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून, या तीर्थक्षेत्रासाठी तब्बल पाच कोटींचा निधी मंजूर झाला आहे. विशेषतः आता तीर्थक्षेत्र तथा पर्यटन केंद्र उनपदेवचा कायापालट होणार आहे.

आमदार लता सोनवणे व माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे हे चोपडा विधानसभा मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असतात. तीर्थक्षेत्र तथा पर्यटन केंद्र उनपदेवच्या विकासाकरिता निधी मिळावा, यासाठी आमदार लता सोनवणे व माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे हे सातत्याने प्रयत्न करत होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून, या तीर्थक्षेत्रासाठी तब्बल पाच कोटींचा निधी मंजूर झाला आहे.  दि. ४ रोजी आमदार लता सोनवणे यांच्या हस्ते उनपदेव तीर्थक्षेत्राच्या विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी डॉ. गौरव सोनवणे, डॉ. अमृता सोनवणे, माजी सरपंच भावना माळी, भारती महाजन, विजिता पाटील, नायजाबाई पावरा, पी. आर. माळी, सचिन महाजन, हरिष पाटील, नामदेव पाटील, लोकेश काबरा, संजय पाटील, एम. के. शेटे, नरेंद्र पाटील, मंगल इंगळे, पी. डी. महाजन, कृष्णा महाजन, उपवन संरक्षक प्रथमेश हळपे, वनपाल योगेश साळुंके, बालेश कोतवाल आदी उपस्थित होते. या प्रसंगी वर्डी येथील सुरेश चव्हाण, रामलाल बारेला, लोणी येथील नाना पाटील, विकास पाटील, ग्रामविकास अधिकारी प्रमोद सैंदाने, विकास महाजन (देवगाव), राजू पाटील (पंचक), गोपाळ ठाकरे (वटार), चंद्रशेखर साळुंके, देवेंद्र पाटील, बारकू पाटील, राहुल पारधी, सायसिंग पावरा, रामचंद्र पाटील, संजय बारेला, भागवत कोळी, मुख्याध्यापक दीपक पाटील, अर्चना पाटील, भैय्या कोळी, जावेद खान, भूषण देशमुख, दशरथ पाटील, राजू पाटील, पिंटू भोई, विजय कोळी, अमोल कासार आदींसह बहुसंख्य ग्रामस्थांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्र संचालन उमेश बाविस्कर यांनी तर आभार प्रदर्शन सचिन महाजन यांनी केले.

तीर्थक्षेत्राचा बदलणार चेहरामोहरा
उनपदेव तीर्थक्षेत्रस्थळी बच्चे कंपनीसाठी अल्पावधीतच विशेष आकर्षण ठरलेल्या, पण आजमितीला बंद पडलेल्या मिनी ट्रेनला या पाच कोटीच्या विविध विकासकामातून संजीवनी मिळणार आहे. त्यामुळे बंद अवस्थेमुळे चिमुकल्यांच्या आनंदावर विरजन पाडणारी व रुळावरुन उतरवून ठेवलेली ही मिनी ट्रेन थोड्याच दिवसात ट्रॅकवर धावू लागणार आहे. गो मुखातून अव्याहतपणे वाहणाऱ्या गरम पाण्याच्या झऱ्यासाठी देशभर प्रसिद्ध असलेल्या व श्री प्रभु रामचंद्रांच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या तथा सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी निसर्गरम्य वातावरणात असलेल्या उनपदेव तीर्थक्षेत्राचा चेहरामोहरा बदलणार असून पर्यटक व भविकभक्तांच्या संख्येतही वाढ होणार आहे. त्याचप्रमाणे आदिवासी म्युझिअम, भक्त निवास, तिकीट काउंटर, पाण्याच्या कुंडाचे नूतनीकरण, वॉटर फॉल, बगीचांचे सुशोभीकरण, पाणी पुरवठा यांसह अनेक कामे यातून मार्गी लागणार आहेत.