अवकाळी पावसाचे थैमान; शेतकरी त्रस्त

तरुण भारत लाईव्ह । ८ मार्च २०२३। राज्यात अवकाळी पाऊस पडत असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे, त्यातच धरणगाव तालुक्यात झालेल्या वादळी वार्‍यासह पावसाने अनेक गावांमधील शिवारातील पिके जमीनदोस्त झाली. यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले.

धरणगाव तालुक्यात संध्याकाळी तुरळक पावसाच्या सरी पडल्या. मात्र प्रचंड वादळ वार्‍याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. धरणगाव शिवारात एका शेतात नारळाच्या झाडावर वीज पडून झाड जळाले.जवळ पास कुणी नसल्याने कोणतीही हानी झाली नाही. बाभळे, गारखेडा, आनोरा, धानोरा, धरणगाव, शिवार, गंगापुरी, पष्टाने, वंजारी, खपाट, पथराड, बोरखेडा, विवरे, भवरखेडे, अंजनी परिसरातील हिंगोणे,पिंप्री कल्याने खुर्द ,कल्याणे होळ , भोद परिसरात मका ,गहू पिके वादळ वार्‍यामुळे जमीन दोस्त झालेली आहेत.