Jalgaon Weather Update : पश्चिम चक्रवातामुळे १ एप्रिलला जळगावसह राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. अर्थात राज्यात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवली आलीय.
हवामान विभागाने, ३१ मार्चला राज्यातील ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. या सर्व जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर पुण्यासह मध्य महाराष्ट्र कोकण आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.
हेही वाचा : १ एप्रिलपासून देशात लागू होणार नवे नियम, घरातील प्रत्येकाच्या खिशावर होणार परिणाम!
तसेच हवामान विभागाने १ एप्रिलला विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. १ एप्रिलला राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नाशिक, अहमदनगर, जळगाव, संभाजीनगर, बीड, जालना, बुलडाणा, अकोला, वाशिम आणि अमरावती या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर २ एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रला अवकाळी पाऊस झोडपून काढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.