---Advertisement---

नागरिकांनो सावधान! तीन दिवस पाऊस झोडपणार, आयएमडीकडून येलो अलर्ट जारी

---Advertisement---

Weather Update : उन्हाळ्याच्या तीव्र झळा प्रचंड जाणवत असून, दुपारी घराबाहेर पडणे म्हणजे उष्णतेची जणू परीक्षाच देण्यासारखे आहे. अशात वाढलेल्या उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळणार आहे. कारण हवामान विभागाकडून राज्यात अवकाळी पावसाचा इशारा (unseasonal rain alert) देण्यात आला आहे. तर जळगाव जिल्ह्यात आजपासून आगामी तीन दिवस पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली येथे जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तविली असून त्यापार्श्वभूमीवर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच पालघर, ठाणे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर, बीड, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. या सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.

दरम्यान, जळगाव जिल्ह्यात आजपासून आगामी तीन दिवस वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, जिल्ह्यात ७ मेपर्यंत यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे दुपारी ४ वाजेनंतर काही महत्त्वाचे काम असेल तरच बाहेर पडा, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

नंदुरबार जिल्ह्यात तीन दिवस तुरळक पावसाचा अंदाज

नंदुरबार : जिल्ह्यात सोमवार ते बुधवार या दरम्यान तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असून वाऱ्याचा वेग वाढून तो ३० ते ४० किलोमीटर प्रतितास असा राहणार आहे. सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण व तुरळक पावसाचा अंदाज आहे. मंगळवार, ६ मे रोजी तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक ताशी ४० ते ५० किलोमीटर राहून हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. बुधवार, ७ मे रोजी तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, गारपिटीसह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. बदलत्या जिल्हावासीयांना वातावरणामुळे काही काळ तापमानापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. शुक्रवारी तापमान ४३ अंशांवर गेले होते, तर शनिवारी ४० अंशांपर्यंत तापमान होते. तर रविवारी थेट चार अंशाने घटून ते ३६.५ अंशावर आले. शेतकऱ्यांनी मका काढणी करताना काळजी घ्यावी. पीक, चारा झाकून ठेवावा. जे शेतकरी पपई लागवड करत असतील त्यांनीही दक्षता घ्यावी, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment