---Advertisement---

महाराष्ट्रात पुन्हा अवकाळीचा इशारा, शेतकरी चिंतेत

---Advertisement---

Maharashtra Rain : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने चांगलीच हजेरी लावली  आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. तर अनेकांचा संसार या वादळी पावसामुळं उघड्यावर पडला आहे. मात्र, पुन्हा हवामान खात्याने पुढील पाच दिवस अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे.

मध्य महाराष्ट्र” महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांत अवकाळी पाऊस बरसण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर  गडचिरोली, गोंदिया आणि चंद्रपुरसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. तसेच मुंबई आणि ठाण्यात देखील पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

दरम्यान, सध्या सुरु असलेला वातावरण बदलाचा परिणाम शेत पिकांवर होत आहे. कधी कडाक्याचे ऊन तर कधी गारपीटसह पाऊस त्यामुळे शेतीचे नुकसान होत आहे. सततच्या या वातावरण बदलामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment