---Advertisement---

Crime News Dhule : किरकाेळ वादातुन नको ते घडलं, परिसरात खळबळ

---Advertisement---

Crime News Dhule : किरकाेळ वादातून पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी संबंधित पतीला अटक केली आहे.

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील मोहिदा येथे ही घटना घडली. नंदा पावरा व बाळू पावरा हे दांपत्य या ठिकाणी वास्तव्यास आहे. आपल्या शेतातील घरात हे दाम्पत्य राहायचे.

या दोघांमध्ये रात्री वाद झाला. या वादावेळी पती बाळू याने दारुच्या नशेत पत्नी नंदा हिच्या डोक्यात लाकडी दांडके मारले. यावेळी जबर मारहाण झाल्याने पत्नी नंदा (वय 30) हिचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच शिरपूर तालुका पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. कोतवाल म्हणून काम करत असलेला मा रेकरी पती बाळू पावरा (वय 40) यास पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले. नंदा पावरा यांचा मृतदेह पोलिसांनी तपासणीसाठी पाठविला आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment