आगामी विधानसभा निवडणुका समोर ठेवून, सर्व पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरवात केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी शिंदे गटाची बैठक सुरु आहे. या बैठकीत विधानसभेच्या रणनीतीबाबत चर्चा होणार आहे. शिवसेना महायुतीत किती जागा लढणार ? याबाबतही चर्चा होणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
या बैठकीला सर्व आमदार, पदाधिकारी उपस्थित आहेत. आपण 100 विधानसभा लढवूयात, अशी मागणी आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडली आहे. लोकसभा निवडणुकीत आपला जो स्ट्राईक रेट राहिला आहे त्या हिशोबाने आपण 100 जागा जिंकू शकतो, असा विश्वास आमदारांनी व्यक्त केला. त्यामुळे शिंदे गटाकडून 100 विधानसभा मतदारसंघांमध्ये निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यासोबतच प्रभारींची देखील नेमणूक करण्यात आली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या सूचना काय?
सरकारी योजना सगळीकडे प्रसारित करा. मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांच्या सरकारने जारी केलेल्या योजनांचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार करा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी आमदार आणि पदाधिकाऱ्यांना केलं आहे. सदस्य नोंदणीवर भर देण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. तसेच शिवसेना युवासेना महिला आघाडीपदाची देखील नेमणूक करा, अशी मागणी या बैठकीत करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.