update : Shiv Sena Maharashtra MLA Disqualification:  अपात्रता प्रकरणाच्या निकाल वाचनाला सुरुवात

Shiv Sena Maharashtra MLA Disqualification: थोड्याच वेळात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा फैसला होणार, शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्षांकडून निकाल वाचनाला सुरुवात झाली आहे.

सहा गटांत हा निकाल वाचला जाणार आहे.  सुमारे 200  पानांचा एक निकाल असून सहा गटांचा मिळून सुमारे बाराशे पानांचे निकाल पत्र तयार करण्यात आले आहे.  परिणामी, सहा गटांतील निकालांचा केवळ सारांश वाचला जाईल आणि नंतर संपूर्ण निकालाची प्रत दोन्ही गटांना पाठवली जाईल.

शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले सभागृहात पोहोचले. आणि त्यांनी सभागृहात येताच ‘जय श्री राम’चा नारा दिला.

ठाण्यातील आनंद आश्रम या ठिकाणी आमदार अपात्रता निकालाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तसेच या ठिकाणी जल्लोषाची तयारीला सुरुवात काही वेळात होईल.

शिंदे गटाचे आमदार  दिपक केसरकरही उपस्थित आहे. यावेळी केसरकरांनी ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक आणि अंबादास दानवे यांना हस्तांदोलन केलं. मात्र, यावेळी नाईक आणि दानवे यांच्यामध्ये बसलेल्या सुनील प्रभूंकडे त्यांनी पाहिलंही नाही.

थोड्याच वेळात आमदार अपात्रतेचा निकाल. आमदार अपात्रता प्रकरणात निकाल कोणत्या गटाच्या बाजूने लागणार? याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे.

या सुनावणीसाठी ठाकरे गट आणि शिंदे गट दोन्ही गटातील नेते उपस्थित आहेत. निकाल वाचनाआधी विधानसभा अध्यक्षांची वरिष्ठ वकिलांसोबत चर्चा. थोड्याच वेळात निकाल स्पष्ट होणार.