update : Shiv Sena Maharashtra MLA Disqualification:  विधीमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये शिंदेंचे आमदार आणि ठाकरेंचे आमदार कुठे बसलेत?

update : Shiv Sena Maharashtra MLA Disqualification:   आमदार अपात्रता निकाल वाचनासाठी विधीमंडळाच्या सभागृहात शिंदे गटाचे आमदार उपस्थित आहेत. शिंदे गटाकडून बालाजी किणीकर, ज्ञानराज चौगुले,भरत गोगावले, संजय शीरसाट, यामिनी जाधव, दीपक केसरकर, खासदार राहुल शेवाळे सभागृहात दाखल झाले आहेत.

शिवसेना आमदार अपात्रता MLA Disqualification प्रकरणाची सुनावणी विधीमंडळाच्या सभागृहात पार पडणार आहे. आज विधानसभा अध्यक्ष निकाल वाचून दाखवणार आहेत. या सुनावणीसाठी ठाकरे गट आणि शिंदे गट दोन्ही गटातील नेते उपस्थित आहेत. निकाल वाचन विधीमंडळातील सेंट्रल हॉलमध्ये पार पडणार आहे. सेंट्रल हॉलमध्ये सध्या यामिनी जाधव, बालाजी किणीकर, मंगेश कुडाळकर, भरत गोगावले मधल्या रांगेत बसले आहेत.

 

सुनील प्रभू, अंबादास दानवे, वैभव नाईक, सुनील शिंदे हे उजव्या बाजूच्या रांगेत बसले आहेत. तर शिंदेगटाच्या मधल्या रांगेत शेवटच्या बाकावर दिपक केसरकर आणि राहुल शेवाळे एकत्र बसले आहेत.