पाच ग्रहांच्या स्थितीत होणार उलथापालथ; या राशींच्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार

तरुण भारत लाईव्ह । २७ ऑगस्ट २०२३। सप्टेंबर महिन्यात पाच ग्रहांच्या स्थितीत बदल होणार आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरवातीलाच गुरु ग्रह मेष राशीत वक्री होईल. त्याबरोबरच चार सप्टेंबरला शुक्र कर्क राशीत मार्गस्थ होईल. १७ सप्टेंबरला सूर्य सिंह राशीतून कन्या राशीत प्रवेश करेल. ग्रहांच्या या बदलामुळे राशीचक्रावर बऱ्याच प्रमाणावर परिणाम दिसून येईल. या बदलामुळे काही राशींना जबरदस्त फायदा होणार आहे. तर कोणत्या आहे त्या राशी जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

मेष रास
या काळात मेष राशींच्या लोकांना नोकरीच्या नव्या संधी चालून येतील. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. काही जुने आजार असतील तर ते या काळात पूर्णपणे बरे होतील. नशीब तुमच्या सोबत असेल.

वृषभ रास
वृषभ राशींच्या लोकांना हा काळ उत्तम असणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेत अपेक्षित यश मिळेल. व्यवसाय मध्ये बऱ्याच प्रमाणात लाभ होऊ शकतात. घरातील मंडळींचा पाठिंबा मिळेल. हाती घेतलेल्या प्रत्येक कामात यश मिळेल.

तूळ रास
या राशींच्या लोकांचा सप्टेंबर महिना आनंदात जाईल. वाहन आणि प्रॉपर्टी खरेदीचा योग जुळून येईल. मुलांकडून शुभ वार्ता समजतील. वैवाहिक जीवनही आनंदात व्यतीत होईल. या कालावधीत रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे.