---Advertisement---
नवी दिल्ली : १ येत्या ऑक्टोबरपासून यूपीआयवरील व्यक्ती-ते-व्यक्ती (पीरपी) ‘कलेक्ट रिक्वेस्ट’ सेवा थांबविण्यात येणार आहे. फसवणुकीच्या घटनांना आळा घालण्यासाठी एनपीसीआयने हा निर्णय घेतला असून बँका आणि पेमेंट अॅप्सना सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
‘कलेक्ट रिक्वेस्ट”लाच “पुल ट्रॅन्ड्रॉक्शन” सुविधा असेही म्हटले जाते. याद्वारे एका वापरकर्त्यास दुसऱ्या वापरकर्त्याकडून ‘यूपीआय’द्वारे पैसे मागता येतात. याचा फसवणूक करणाऱ्यांकडून गैरवापर होत आहे. त्यामुळे ही सेवाच थांबविण्याचा निर्णय ‘एनपीसीआय’ने घेतला आहे.
कारखाने बंद पडणार, नोकऱ्या जाणार ?
नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्थेसाठी धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डी. सुब्बाराव यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार, अमेरिकेने लावलेला ५० टक्के टॅरिफ आणि चीनकडून होणाऱ्या ‘डम्पिंग’ मुळे भारताच्या जीडीपीत २० ते ५० बेसिस पॉइंट्सपर्यंत घट होऊ शकते.
यामुळे भारताच्या एकूण निर्यातीपैकी २% निर्यातीवर थेट परिणाम होऊ शकतो. तसेच, कारखाने बंद पडणे, यात काम करणाऱ्या कामगारांच्या नोकऱ्या जाणे आणि व्यापारात घट होण्याचा धोकाही त्यांनी व्यक्त केला आहे.