UPSC ची सर्वात मोठी कारवाई; पूजा खेडकरांचे आयएएस पद रद्द, परीक्षेवरही घातली बंदी

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना मोठा धक्का बसला आहे. पूजा खेडकर यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. याशिवाय यूपीएससी परीक्षेला बसण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. याचा अर्थ आता भविष्यात ती IAS-IPS होऊ शकणार नाही नाहीय. पूजा खेडकर यांनी नियमांचे उल्लंघन केल्याचं आणि त्यामध्ये त्या दोषी आढळल्यामुळे त्यांच्यावर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.

या प्रकरणात पूजा खेडकर यांनी दिल्लीतल्या पटियाला हाऊस कोर्टामध्ये अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. त्यावर कोर्ट उद्या निर्णय देणार आहे. त्यापूर्वी यूपीएससीने पूजा खेडकरबाबत मोठा निर्णय घेतला आहे. यूपीएससीने पूजा खेडकरचे आयएएस पद रद्द केले आहे. यूपीएससीने प्रेस नोट जाहीर केली आहे. यामध्ये पूजा खेडकरला २०२२ साली आम्ही दिलेले आयएएस पद तात्पुरतं रद्द करत आहोत असे म्हटले आहे.

यूपीएससीने पूजा खेडकरचे आयएएस पद रद्द केल्यामुळे आता तिला भविष्यातील सर्व परीक्षा आणि निवडींमधून कायमचे काढून टाकण्याचे निर्देश दिले आहे. नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल पूजा खेडकरला दोषी ठरवण्यात आले आहे. पूजा खेडकरने आयएएस होण्यासाठी यूपीएससीची फसवणूक की होती. त्यामुळे आता पूजा खेडकरच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत. पूजा खेडकरविरोधात यूपीएससीने दिल्लीमध्ये गुन्हा दाखल केला होता. पूजा खेडकरला यूपीएससीने चौकशीसाठी बोलावले होते. पण ती अद्याप चौकशीसाठी हजर झालेली नाही. सध्या पूजा खेडकरचा फोन नॉटरिचेबल लागत आहे. त्यामुळे पूजा खेडकर सध्या कुठे आहे असे प्रश्न उपस्थित केले जात आहे