UPSC Main Exam Results: युपीएससीच्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर; असा पाहा निकाल

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगानं सिव्हिल सेवा मुख्य परीक्षा २०२३ चा निकाल आज (८ डिसेंबर) जाहीर केला. युपीएससीच्या https://upsc.gov.in/WR-CSM-2023-081223-ENG.pdf या लिंकवर जाऊन उमेदवारांना थेट आपला निकाल पाहता येणार आहे. यंदा १५ ते २४ सप्टेंबर या कालावधीत युपीएससीची मुख्य परीक्षा पार पडली होती.

https://twitter.com/DDNewslive/status/1733122389368828248/photo/1?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1733122389368828248%7Ctwgr%5E6879250b025a650b40b0bf61fc15f97abada0397%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.esakal.com%2Fdesh%2Fupsc-declares-civil-services-exam-cse-main-2023-results-aau85

युपीएससीनं २८ उमेदवारांचा निकाल कोर्टानं प्रलंबित प्रकरणांमुळं रोखून ठेवले होते. पण आता निकाल जाहीर करण्यात आला आहे. ही परीक्षा दिलेल्या उमेदवारांचे अंतिम निकाल १५ दिवसांच्या आत पर्सनल इन्टरव्हूनतंर आयोगाच्या वेबसाईटवर अपलोड केले जाणार आहेत. हे निकाल ३० दिवसांसाठी वेबसाईटवर उपलब्ध राहतील.

निकाल असा चेक करा

  1. युपीएससीच्या अधिकृत वेबसाईटवर जा upsc.gov.in

  2. होमपेजवरील रिझल्ट या लिंकवर क्लीक करा

  3. पीडीएफच्या स्वरुपात एक नवीन पेज उघडेल

  4. त्यानंतर पीडीएफ डाऊनलोड करा आणि त्याची प्रिंटआऊट घ्या

    ज्या उमेदवारांचा रोल नंबर पीडीएफमध्ये असेल. ते IAS, IFS, IPS आणि इतर केंद्रीय सेवा (गट अ आणि गट ब) यांची पर्सनल इन्टरव्ह्यूसाठी पात्र झाले आहेत.

  5. या दिवसापासून मुलाखतीचे फॉर्म भरले जाणार

    पर्सनल इन्टरव्हूसाठी पात्र ठरलेले उमेदवारांना आपला डिटेल फॉर्म -२ (DAF-II) कम्पल्सरी भरावा आणि जमा करावा लागणार आहे. जो ९ डिसेंबर ते १६ डिसेंबरपर्यंत सायंकाळी ५ वाजेपर्यंत वेबसाईटवर उपलब्ध असेल. या उमेदवारांची मुलाखतीची तारीख योग्य वेळी जाहीर केली जाईल. ही मुलाखत लोकसेवा आयोगाचं कार्यालय, धोलपूर हाऊस, शहाजहाँ रोड, नवी दिल्ली – ११००६९ इथं पार पडतील.