---Advertisement---

युद्ध भडकणार! इस्रायल – हमास युध्दात अमेरिकेची उडी

---Advertisement---

वॉश्गिंटन : हमासने इस्रायलवर मोठा हल्ला केला आहे. या प्राणघातक हल्ल्यात आतापर्यंत 700 हून अधिक इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्याला इस्रायलनेही चोख प्रत्युत्तर दिले. हमासच्या या हल्ल्यानंतर अनेक देशांनी इस्रायलला मदतीचा हात पुढे केला आहे. अमेरिकेने इस्रायलला मदत करण्याची मोठी घोषणा केली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे. यानंतर त्याने भूमध्य समुद्रात युद्धनौकांचा ताफा पाठवला. यासोबतच अमेरिकेने F-35, F-15 आणि F-16 या लढाऊ विमानांनाही अलर्टवर ठेवलं आहे. यासोबतच एका अमेरिकन अधिकाऱ्याने सांगितले की, हमासच्या या हल्ल्यात चार अमेरिकन नागरिकांचाही मृत्यू झाला आहे.

हमासच्या दहशतवाद्यांनी गाझामधून इस्रायलमध्ये तीन हजाराहून अधिक रॉकेट्स डागून हल्ला केल्यानंतर इस्रायल आणि गाझामध्ये आतापर्यंत 1000 हून अधिक लोक ठार झाले आहेत. याला जोरदार प्रत्युत्तर देताना इस्रायली संरक्षण दलांनी गाझामध्ये हल्ला केला. हमासच्या दहशतवाद्यांनी आतापर्यंत बर्‍याच नागरिकांचे अपहरण केले आहे आणि अनेक लोकांना ठार मारले आहे. यानंतर इस्रायलनेही भयंकर युद्ध घोषित केलं आहे.

इस्रायली सैन्य आणि हमास या दहशतवादी गट यांच्यात झालेल्या चकमकीमुळे देशभरातील बर्‍याच भागावर याचा परिणाम झाला. इस्रायलवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर, इस्रायलमधील सैनिकांसह किमान 700 इस्त्रायली ठार झाले आहेत आणि 1,900 हून अधिक जखमी झाले आहेत. गाझा पट्टीमध्ये इस्रायली काउंटरच्या हल्ल्यानंतर 450 हून अधिक मृत्यू झाले आणि सुमारे 2,300 जखमी झाले, ज्यामुळे एकूण मृत्यू 1000 पेक्षा जास्त झाले.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment