युक्रेन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे अचानकपणे युक्रेन दौऱ्यावर आले आहेत. युक्रेनचे राष्ट्रपती जेलेन्स्की यांची भेट घेतली आहे.
दरम्यान, मागील वर्षभरापासून रशिया आणि युक्रेनचे युद्ध सुरू आहे. रशियाकडून अजूनही युक्रेनवर हल्ले सुरू असताना दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे अचानकपणे युक्रेनची राजधानी किव्हमध्ये दाखल झाले आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी युक्रेनचे राष्ट्रपती जेलेन्स्की यांची भेट घेतली आहे. बायडन यांनी वापरलेल्या धक्कातंत्रामुळे जगभरात चर्चा सुरू झाल्या आहेत. दोन्ही देशांच्या प्रमुखांची बैठक झाल्यानंतर मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे.