---Advertisement---

ग्राहकांनो, दिवसा वीज वापरा अन् मिळवा सवलत, महावितरणचे आवाहन

---Advertisement---

TOD meter : नेहमी अवाजवी वीजबिलांबाबत तक्रारी करणाऱ्या घरगुती ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महावितरणने १ जुलैपासून सवलतीची योजना आणली आहे. औद्योगिक ग्राहकांसाठी मर्यादित असलेली ‘टाइम ऑफ डे’ (टीओडी मीटर) वीजदर सवलत आता घरगुती ग्राहकांनाही १ जुलैपासून लागू केली आहे. यात सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत या वेळेत वापरलेल्या विजेवर प्रतियुनिट ८० पैसे सवलत ग्राहकांना मिळणार आहे. त्यामुळे या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

महावितरणने वीज वितरण प्रणालीच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. महावितरणकडे घरगुती ग्राहकांचीच संख्या अधिक आहे. मात्र, खंडित वीजपुरवठा, वाढीव बिल आदी कारणांमुळे ग्राहक कमालीचे वैतागले आहे. ग्रामीण भागात तर विजेच्या मोठ्या प्रमाणात समस्या आहेत, तर दुसरीकडे वीजबिल अव्वाच्या सव्वा पाठवून वसुलीसाठी तगादा लावला जातो. वीजबिल थकीत असल्यास पुरवठा खंडित करण्यात येतो. त्यामुळे महावितरणने टीओडी मीटर बसवून ग्राहकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

---Advertisement---

घरगुती ग्राहकांनाही फायदा

घरगुती ग्राहकांना टीओडी मीटरमुळे फायदे होणार आहे. दर दिवशीचे रीडिंग एकदाच नाही तर चार वेळा बघता येणार असून, यात सवलतही मिळणार आहे. त्यामुळे ग्राहकांना मिटरमध्ये काही दोष आढळल्यास त्याचीही तक्रार करता येणार आहे.

स्मार्ट मीटरविषयी ग्राहकांमध्ये गैरसमज

स्मार्ट मीटरविषयी अजूनही ग्राहकांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे स्मार्ट मीटरला अजूनही काही ग्राहकांचा विरोध कायम आहे. या मीटरमुळे जादा वीजबिल येईल, असे ग्राहकांना वाटते. मात्र महावितरणतर्फे असे कुठलेही वीजबिल ग्राहकांना अवाजवी येणार नसून, नियमानुसारच बिल देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

टीओडी मीटर काय ?

टाइम ऑफ डे मीटर केवळ औद्योगिक ग्राहकांनाच दिले जात होते. आता मात्र महावितरण घरगुती ग्राहकांकडेही हे मीटर बसवीत आहे. टीओडी मीटरमुळे ग्राहकांना विजेवर प्रतियुनिट ८० पैसे सवलत मिळणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---