सतत इयरफोन वापरणं बंद करा, नाही तर..

तरुण भारत लाईव्ह । २४ जानेवारी २०२३। आजकाल प्रत्येकाच्याच कानात आपल्याला हेडफोन घातलेले दिसतात. म्हणजे  रस्त्यांवर,ऑफिसमध्ये, घरी किंवा अन्य ठिकाणी. दरम्यान, कानात इयरफोन टाकल्याने अनेक अपघात झाल्याचेही समोर आले आहे. मात्र, इयरफोन वापरणं कुठेच कमी होताना दिसत नाही. यामुळे अपघातच नव्हे, तर याचा अतिवापर केल्यामुळे मेंदूवर देखील अनेक परिणाम होत असतात हे तुम्हाला माहित आहे का? चला तर जाणून घेऊया तरुण भारताच्या माध्यमातून.

हेडफोन वापरणं तरुण आणि तरुणींमध्ये जास्त प्रमाणात वापरत असताना दिसून येत.  मिळालेल्या माहितीनुसार, इयरफोनला गॅझेट म्हणून बनवण्यात आले होते, पण याचा अतिवापर केला जातो. धक्कादायक म्हणजे, लहान मुले सुद्धा इयरफोनचा वापर करताना दिसतात. परंतु, असं निष्काळजीपणे निरंतर इयरफोन्सचा वापर करणे आपल्या कानांसाठी खूप घातक ठरू शकते. हेडफोन आणि इयरफोन एक्सचेंज मुळे कानात संसर्ग होण्याचा सुद्धा धोका निर्माण होतो.

काय परिणाम होतात ?
हेडफोन किंवा इअरफोनमधून निघणारा आवाज कानाच्या पडद्याच्या जवळ आदळतो, त्यामुळे इअरड्रमला इजा होण्याची शक्यता असते.  इयरफोनच्या अतिवापरामुळे कानाला कमी ऐकू येणे त्याचबरोबर बहिरेपणा सुद्धा येऊ शकतो. इअरड्रमला इजा होण्याची शक्यता असते. इअरफोन किंवा हेडफोनमधून निघणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरी या मेंदूवर परिणाम करतात. खूप वेळ हेडफोन लावल्यास आपल्या मेंदूवरही परिणाम होतो. हेडफोन आणि इयरफोनच्या अतिवापरामुळे आपले कान आणि तसेच हृदयालादेखील याचा त्रास होत असतो. अनेक वेळा इअरफोनच्या अतिवापरामुळे आवाजाचा भ्रम निर्माण होतो. हेडफोन आणि इयरफोन एक्सचेन्ज केल्याने सुद्धा  इअरफोनच्या स्पंजच्या माध्यमातून बॅक्टेरिआ हे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात पोहोचतात. अशामुळे कानात इन्फेक्शनही होऊ शकते.