---Advertisement---
Uttarkashi Cloudburst : उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली गावात ढगफुटी झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीत महाराष्ट्राच्या विविध भागांतील १५१ पर्यटक अडकले आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन उत्तराखंडकडे रवाना झाले आहे. दरम्यान, मदतीसाठी खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा , असे आवाहन करण्यात आले आहे.
उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील झालेल्या नैसर्गिक आपत्तीत महाराष्ट्राच्या विविध भागांतील १५१ पर्यटक अडकले आहेत. तर जळगावच्या अयोध्यानगरात वास्तव्यास असलेल्या गायिकेसह एकाच कुटुंबातील तीन सदस्य आणि अन्य असे २२ भाविक अडकून पडले आहेत. जळगावच्या अन्य १९ भाविकांमध्ये पाळधीचे (ता. धरणगाव) १३, धरणगावचे ५ आणि पाचोऱ्यातील एक जवानाचा समावेश आहे.
गायिका अनामिक मेहरा, आरोही मेहरा आणि रुपेश मेहरा हे उत्तरकाशीला दर्शनासह एका गाण्याच्या चित्रीकरणासाठी गेले होते. तीन दिवसांपासून मेहरांशी संपर्क होत नसल्याने त्यांचे कुटुंबीय चिंतित पडले होते. त्यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षाशी संपर्क केला. तेव्हा नियंत्रण कक्षाने उत्तरकाशी प्रशासनाकडून माहिती घेतली.
उत्तरकाशीतील प्रशासनाच्या माहितीनुसार सर्वच कंपन्यांचे मोबाइल टॉवर वाहून गेले आहेत. त्यामुळे या भागात कुठल्याही कंपनीची मोबाइल सेवेला नेटवर्क उपलब्ध होऊ शकत नाही. मेहरा कुटुंबीय दोन दिवस या प्रशासनाच्या निगराणीखाली वास्तव्यास होते. मात्र आता त्यांना नजीकच्या एका गावात सुरक्षितस्थळी नेण्यात आले आहे.
मदतीसाठी असा साधा संपर्क
- राज्य आपत्कालीन कार्य केंद्र, महाराष्ट्र
संपर्क: ९३२१५ ८७१४३ / ०२२-२२०२७९९० / ०२२-२२७९४२२९
- डॉ. भालचंद्र चव्हाण,
संचालक, आपत्ती व्यवस्थापन केंद्र, महाराष्ट्र
मोबाईल: ९४०४६९५३५६
- उत्तराखंड राज्य आपत्कालीन कार्य केंद्र
संपर्क: ०१३५-२७१०३३४ / ८२१८८६७००५
- श्री. प्रशांत आर्य,
जिल्हाधिकारी, उत्तरकाशी
मोबाईल: ९४१२०७७५०० / ८४७७९५३५००
- मेहेरबान सिंग,
समन्वय अधिकारी
मोबाईल: ९४१२९२५६६६
- श्रीमती मुक्ता मिश्रा,
सहायक जिल्हाधिकारी, उत्तरकाशी
मोबाईल: ७५७९४७४७४०
- जय पनवार,
आपत्ती व्यवस्थापन कक्ष, उत्तराखंड
मोबाईल: ९४५६३२६६४१
- सचिन कुरवे,
समन्वय अधिकारी
मोबाईल: ८४४५६३२३१९