---Advertisement---

Vaishali Suryavanshi : अकस्मात निधन झालेल्या कार्यकर्त्याच्या कुटुंबाला मदतीचा हात

---Advertisement---

पाचोरा : तालुक्यातील निष्ठावंत शिवसैनिक कै. गजानन गोविंदा पोतदार यांच्या कुटुंबाला शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी यांच्या वतीने मदतीचा हात देण्यात आला.

पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव (हरेश्वर) येथील शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कट्टर कार्यकर्ते गजानन गोविंदा पोतदार यांचे अलीकडेच 21 जुलै रोजी अकस्मात निधन झाले. ते शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका विभाग प्रमुख तर जय संघर्ष अखील भारतीय वाहन चालक संघटनेचे तालुकाध्यक्ष होते. त्यांच्या आकस्मीक निधनामुळे अगदी सर्वसाधारण स्थिती असणाऱ्या त्यांच्या कुटुंबावर वज्राघात झाला आहे.

या अनुषंगाने शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या वैशाली सुर्यवंशी यांनी त्यांच्या वतीने पोतदार कुटुंबाला रोख अकरा हजार रूपयांची तातडीची मदत प्रदान केली. तर पोतदार कुटुंबाच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहणार असल्याची ग्वाही देखील त्यांनी दिली. याप्रसंगी संघर्ष संघटनेच्या वतीने 81 हजार रूपयांची मदत देखील प्रदान करण्यात आली.

या प्रसंगी नरेंद्रसिंग सूर्यवंशी , उध्दव मराठे, प्रवीण वाघ, संघर्षचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कैलास आप्पा, राजधर आबा, कोमल आबा, भास्कर नाना, मिलिंद तात्या,गोविंद माधवराव पाटील,विनोद भैया, अतुल सूर्यवंशी, सुरेश वाघ, राहुल चौधरी, भागवत पाटील, समाधान हटकर, प्रीतेश जैन, राहुल बडगुजर,रवी पाटील, राहुल सावळे, शशी पाटील,अरुण तांबे ,राजू गायकवाड,भूषण कासार, भारत क्षीरसागर यांच्यासह संघर्ष ग्रुपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment