बोदवड : तालुक्यातील चिखली येथील रिक्षा ड्रायव्हरची मुलगी वैष्णवी ज्ञानेश्वर पाटील हिने आपल्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ‘मर्चंट नेव्ही’ मधील चीफ ऑफिसर या पदाला गवसणी घातली आहे.
मराठा सेवा संघाचे विभागीय कार्याध्यक्ष शिवश्री राम पवार, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा लीना पवार ,लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे , श्रीराम पाटील, समवेत जिल्हाध्यक्ष अनिल पाटील, संजय पांडुरंग पाटील, विलास सटाले, मधु पाटील यांनी वैष्णवी पाटील हीचा चिखली येथे जाऊन सत्कार केला आहे.
विशेषतः वैष्णवीच्या यशानं ग्रामीण भागातल्या मुलींमध्ये चैतन्य संचारेल आणि तिच्याकडून प्रेरणा घेऊन प्रतिकूलतेवर मात करत विविध क्षेत्रात ग्रामीण भागातल्या मुली यशस्वी बाजी मारतील यात शंका नाही.