Valentine Special : प्रत्येक नातं आपलं व्हॅलेंटाईन असावं…

Valentine Special : ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,  तुमचं आमचं सेम असतं..ही कविवर्य मंगेश पाडगावकर यांची प्रसिद्ध कविता आपण बऱ्याच वेळा वाचतो किंवा प्रसंगानुसार सादर करतो  ..पण तुमचं आमचं प्रेम नात्या नुसार डिफ्रंट असतं,हे सुद्धा आता मला म्हणावयासे वाटते कारण प्रेम ही  सर्वांच्या हृदयात  साठवलेली भावना असली तरी तीचे खूप पदर आहेत आणि प्रत्येक पदराला अनेक स्तर आहेत, जे वेगवेगळे असले तरी एकसंघ आहेत.

त्यात प्रेमाचे अनेक पैलू आहेत..आणि हे पैलू पाहण्यासाठी प्रेम समजून घेणं गरजेचं आहे.  नेमकं आपल्याकडे प्रेम काय असतं हे समजण्याचा महिना जणू फेब्रुवारी च असतो.!कारण फेब्रुवारी उजाडला की गुलाब, टेडी, चॉकलेट, ग्रीटिंग्ज, विविध भेटवस्तू यांसारख्या वस्तूंनी बाजारपेठा,गजबजून जातात. आणि अवघी तरुणाई प्रेम शोधायला आधुनिक काळाचे फंडे वापरु लागते..तसं हे प्रेम म्हणजे नेमके काय, असे विचारल्यास विविध वयोगटांतून विविध उत्तरे येण्याची शक्यता आहे.तरी ही अजून ही प्रेम ही संकल्पना स्त्री पुरुष यांच्या विशिष्ट संबंधावरच येऊन थांबते हे आजच्या काळाचे दुर्दैव्य आहे..

 

 

धार्मिक ग्रंथ, थोर तत्वज्ञ, आध्यात्मिक गुरू, योगी, मानववंशशास्त्रज्ञ ते मनोवैज्ञानिक यांनी प्रेम या भावनेविषयी बरेच काही सांगून आणि लिहून ठेवले आहे. ते सर्वसामान्यांच्या पचनी पडतेच असे नाही. प्रेमाकडे तटस्थपणे पाहता येईल, अशी अलौकिक दृष्टी हवी आणि सामाजिक भानही. हे सामाजिक भान आपणच जाणायला आणि जपायला हवे.आणि त्या साठी निम्मित आहे14 फेब्रुवारी या व्हॅलेंटाईन डे चे…

 

आपल्या आयुष्यात एखाद्याला आपलं व्हॅलेंटाइन बनवणे अगदीच रास्त असले तरी आधी आपण स्वतः च स्वतः चे व्हॅलेंटाईन होणे गरजेचे आहे..आपण स्वतःवरही प्रेम करणे आवश्यक आहे- आपण स्वतःवर प्रेम करतो, याचा अर्थ असा नाही की आपण समाधान आणि मनोरंजनाच्या अमर्याद इच्छा ठेवाव्या. कारणअशा गोष्टीतून मिळणारा अत्यल्प आनंद शाश्वत नसतो आणि आपण कायम अधिक हवे असण्याच्या इच्छेपाशी येऊन थांबतो. म्हणून आपणआत्मकेंद्री किंवा आत्मप्रौढीच्या स्वरूपात नव्हे, तर स्वतःच्या तात्कालिक आणि दीर्घकालीन कल्याणाची काळजी बाळगून स्वतःवर खरे प्रेम करावं आणि क्षणिक सुखापेक्षा आपण शाश्वत सुखाचा शोध घेण्याचा प्रयत्न करायला हवा..आणि स्वतःवर प्रेम करता करता आपण विणलेल्या प्रेमाच्या प्रत्येक नात्यावर ही नैतिक आणि स्वच्छ भावनेने भरभरून प्रेम करावं. आपलं प्रत्येक नातं आपल्यासाठी व्हॅलेंटाईन बनवावे..

 

नात्यातील प्रत्येकाच्या आनंदासाठीची मनोकामना करणे आणि त्यांच्या सुखासाठी प्रयत्नशील असणे, त्या सुखाची कारणे शोधणे म्हणजे प्रेम होय. प्रत्येक नात्याला या प्रेम भावनेची गरज आहे,इतरांच्या गरजांबाबत संवेदनशील असणे आणि त्यांच्या सुखप्राप्तीसाठी योगदान देण्याची इच्छा बाळगणे, या गोष्टी यात अंतर्भूत आहेत.समोरच्याचे  आपल्यासोबतचे नाते कसे आहे, तो आपल्याशी कसा वागला आहे किंवा त्याच्याकडून प्रत्युत्तरादाखल आपल्याला प्रेम मिळो अथवा ना मिळो, या गोष्टींचा परिणाम पडू न देता प्रेम वाटता आले पाहिजे…

 

आपण ज्या नात्यावर प्रेम करतो, त्या व्यक्तीने आपण दुखावले जाण्याजोगे वर्तन केल्यास, आपण त्या व्यक्तीवर प्रेम करणे थांबवणे ही विकृत आसक्ती ठरू शकते.प्रेमातील ही आसक्ती नात्यासाठी घातक ठरू शकते.म्हणूनच  इतरांचे आपल्यावरील प्रेम किंवा त्यांच्याकडून घेतली जाणारी काळजी यावर प्रेम आधारलेले नसावे.., प्रेमात एकमेकांवर  अवलंबनाचा प्रश्न नाही. कारण आसक्ती आणि अवलंबन मिश्रित प्रेम अस्थिर असत.,म्हणून च नात कोणते ही असो,त्या नात्या वर मनापासून प्रेम करतांना, आपला

 

प्रेमभाव विकसित करण्यासाठी आपल्याला एकमेकातील परस्परसंबंध समजून घेणे आवश्यक आहे.

 

कारण प्रेम ही आपल्या  अंतर्मनातीलआनंदाची अनुभूती आहे. त्यामुळं त्यातून  इतरांप्रती आत्मीयतेची आणि काळजीची नैसर्गिक भावना उत्पन्न झाली पाहिजे…आणि जेव्हा  अशी निरागस  भावना प्रेमाची आपल्यात निर्माण होईल तेव्हा ते नक्कीच वैश्विक प्रेम  बनु ही शकते..आणि आपल् प्रत्येक नातं आणि त्यातील प्रेम चिरकाल टिकणारे असेल आणि प्रेमाचे हे बंध आयुष्यभरासाठी  असतील आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने आपलं नात आणि आपलं प्रेम एकमेकांसाठी  व्हॅलेंटाईन  ठरेल…