व्हॅलेंटाईन डे : गुलाबाचे दर वधारले

तरुण भारत लाईव्ह ।०६ फेब्रुवारी २०२३। व्हॅलेंटाईन डे जवळ आला असून गुलाबाच्या फुलाची मागणी वाढली आहे. दररोज मिरजेतून रेल्वेने दिल्लीला व्हॅलेंटाईन डे साठी हरितगृहातील फुलांची निर्यात सुरु झालेली आहे. व्हॅलेंटाईन डे ला मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने डच गुलाबांचा दर वाढला आहे. नक्की किती रुपयांनी हे दर वाढले आहे हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात हरितगृहात डच गुलाबाचे उत्पादन होते. व्हॅलेंटाईन डे ला हरितगृहातील डच फुलांना मागणी असते त्यामुळे मिरजेतून रेल्वेने दिल्लीला व्हॅलेंटाईन डे साठी हरितगृहातील फुलांची निर्यात सुरु झालेली आहे. यावर्षी जरबेरा तसेच कार्नेशिया या फुलांची निर्यात जास्त आहे. फुलांचे दर वाढण्याचे कारण असे कि जरबेरा तसेच कार्नेशिया या फुलांना चांगला दर मिळत असून मालवाहतुकीसाठी रेल्वेच्या भाडेवाढीमुळे फुलांची निर्यात महागली आहे. दिल्ली परिसरात गुलाबाच्या फुलाचे उत्पादन होत नसल्याने दिल्लीला दर आणि मागणी जास्त आहे.

बाजारात गुलाबाचा दर प्रतिशेकडा २०० रुपयावरून थेट ३०० रुपयांवर पोहोचला असून, जरबेरा तसेच कार्नेशिया या फुलांचे दरही वाढले असून यामुळे फुल उत्पादक शेतकऱ्यांना व्हॅलेंटाईन डेचा आधार मिळाला आहे.