वाल्मिक कराड याला ७ दिवसांची पोलीस कोठडी, नेमकं कोर्टात काय घडलं ?

बीड : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात प्रमुख आरोपी वाल्मिक कराड याला केज कोर्टाकडून ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे वाल्मिक कराड २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत असणार आहे.

दरम्यान, एसआयटीने १० दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती, मात्र न्यायालयाने यावर विचार करून ७ दिवसांची कोठडी मंजूर केली.

आज बीडच्या मकोका कोर्टात या संदर्भात सुनावणी पार पडली. कोर्टरूममध्ये न्यायाधीश, आरोपी, त्याचे वकील, तपास अधिकारी आणि सरकारी वकील उपस्थित होते.

वाल्मिक कराडच्या वकिलांनी अटकेवर आक्षेप घेत आरोप फेटाळले आणि अटकेला बेकायदेशीर ठरवले. मात्र न्यायालयाने सर्व युक्तिवाद ऐकल्यानंतर ७ दिवसांची पोलीस कोठडी देण्याचा निर्णय दिला. सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील पुढील तपासासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.