पुण्यातील नाना पेठेत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची रविवार, १ रोजी रात्री ८.३० च्या सुमारास हत्या झाली. तीन-चार दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी वनराज यांच्यावर धडाधड गोळ्या झाडल्या. एवढेच नव्हे तर ते खाली कोसळल्यावर त्यांच्यावर कोयत्यानेही वार करण्यात आले. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. त्यात १२ हल्लेखोर दिसत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर आरोपींची ओळख पटली आहे. हा हल्ला पूर्वनियोजित होता असा पोलिसांना संशय आहे, कारण हल्ला करण्यापूर्वी त्या परिसरातील वीजही घालवण्यात आली होती. वनराज यांच्यावर बेछूट गोीबार करून, त्यांचा खून केल्यावर सर्व हल्लेखोर पटापट दुचाकीवरून बसून तेथून फरार झाले.
कौटुंबिक वादातून हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून तीन संशियातान ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे.
गणेश कोमकर, सोमनाथ सयाजी गायकवाड आणि तुषार आबा कदम अशी या तिघांची नावे आहेत. गणेश कोमकर हा कुख्यात गुंड बंडू उर्फ सूर्यकांत आंदेकर याचा जावई असल्याची माहिती समोर येत आहे.