---Advertisement---

Varangaon Murder News Update : मद्यपी पतीने पत्नीला संपविले अन् पुणे गाठलं; अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

---Advertisement---

जळगाव : दारूच्या नशेत पत्नीची हत्या करून पसार झालेल्या आरोपी पतीला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. आरोपीला पुण्यातून अटक करण्यात आली असून, त्याला जळगावत आणण्यात आले आहे.

भुसावळ तालुक्यातील वरणगावच्या वेल्हाळे शिवारातील वीटभट्टीवर रविवारी मध्यरात्री आरोपी पती अजीज शेख याने दारूच्या नशेत पत्नी सना अजीज शेख (वय २५, रा. बीड, जि.परळी, वैजनाथ) यांची हत्या करीत पळ काढला होता. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांकडून त्याचा शोध सुरु होता. दरम्यान, अजीज सलीम शेख (वय ३५) याला पुण्यातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, किशोर डिगंबर पाटील यांचे वेल्हाळे शिवारातील शेत गट क्रमांक ६५१ मध्ये शेत असून या शेतात अली हुसेन इसाक कुरेशी हे वीटभट्टी चालवतात. या वीटभट्टीवर कामासाठी परळी जिल्ह्यातील काही जण आले. यामध्ये अजीज शेख आणि पत्नी सना अजीज शेख (वय २५, रा. बीड, जि.परळी, वैजनाथ) हे देखील वीटभट्टीवर कामाला होते. आरोपी पती अजीज शेख याला दारूचे व्यसन असल्याने तो सना शेख हिला दारूच्या नशेत मारहाण करण्याचा प्रकार करत होता.

दरम्यान, शनिवारी अजीज शेख याने वरणगाव येथे बाजारासाठी येत बाजारहाठ केला व या वेळी पुन्हा अजीज शेख याने मद्य प्राशन करून रात्री सव्वाआठ वाजता घरी आला. मध्यरात्रीच्या सुमारास अजीज शेख याने पत्री सनासोबत वाद घालून दारूच्या नशेत तिचा गळा आवळला.

रविवारी सकाळ होवूनही कुटुंब बाहेर न आल्याने काही मजुरांनी खिडकीतून डोकावून पाहिल्यानंतर सना यानिपचीत झोपल्या असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी दार तोडून खोलीत प्रवेश केला असता सदर प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी वरणगाव पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. संशयीत मध्यरात्रीच खुनानंतर पसार झाल्याने त्याचा कसून शोध सुरू करण्यात आला होता.

दरम्यान, खुनानंतर पसार झालेल्या अजीज सलीम शेख (वय ३५) याला पुण्यात जळगाव गुन्हे शाखेने मंगळवारी दुपारी बेड्या ठोकल्या. ही कारवाई जळगाव गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शरद बागल व कृष्णा देशमुख यांच्या पथकाने केली.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment