तरुण भारत लाईव्ह । ८ मार्च २०२३। तुमच्या घरी जर तुम्ही वास्तू टिप्स पाळल्या तर तुम्हाला त्याचा योग्य परिणाम दिसून येणार. सतत आर्थिक अडचणी निर्माण होत असतील तर तुमच्या घरी वास्तू दोष असल्याची दाट शक्यता असते. कारण वास्तू दोषामुळे घरात कधीच शांती राहत नाही.
घरातील किचन हे एक महत्त्वाचा भाग आहे. जर तुमच्या किचनमध्ये वास्तूदोष असेल तर त्याचा विपरीत परिणाम आपल्या दररोजच्या जीवनावर होतो. वास्तूशास्त्रात चुलची दिशा ही दक्षिण – पूर्व कोपऱ्यात असावी. यामुळे घरात सुख शांती आणि समृद्धि राहते. अशा घरांवर राहूचा प्रकोप वाढतो आणि आर्थिक चणचण भासते. याशिवाय चुल तुम्ही उत्तर – पश्चिम दिशेला ठेवू शकता.
वास्तुशास्त्रानुसार आपण कोणत्याही दिवशी चुल खरेदी करू शकत नाही. चुल खरेदी करण्याचाही एक खास दिवस असतो. जर या खास दिवशी तुम्ही चुल खरेदी केली तर यामुळे तुमच्या आयुष्यात भरभराट होऊ शकतो. गॅस, स्टोव धनयत्रोदशीच्या दिवशी खरेदी करावा. या दिवशी खरेदी केल्याने घरी पैसा येतो. याशिवाय तुम्ही गुरुवारी सुद्धा चुल, गॅस किंवा स्टोव्ह खरेदी करू शकता.