---Advertisement---
जळगाव : गत दहा दिवसांपासून घराघरात गआणि सार्वजनिक मंडळांमध्ये विराजमान असलेल्या लाडक्या बाप्पाला शनिवारी ६ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीला निरोप दिला जाणार आहे. विसर्जनाच्या पूर्वसंध्येला दिवसभर आणि सायंकाळी पावसामुळे भाविकांची गणपती पाहण्यासाठी तुरळक गर्दी दिसून आली.
विघ्नहर्ता गणरायाचे मोठ्या थाटामाटात आगमन झाले होते. घराघरात आणि शहरातील सार्वजनिक मंडळांमध्ये बाप्पाच्या आगमनाचा उत्साह होता. दहा दिवस बाप्पाची गीते आणि आरतीच्या आवाजाने वातावरण मंगलमय झाले होते. गत तीन दिवसात शहरातील
गणेश मुर्ती दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
विसर्जनाच्या पूर्वसंध्येला अधिक गर्दी होईल या अनुषंगाने मंडळांनी गर्दी नियंत्रणाचे नियोजनही केले होते. मात्र शुक्रवारी सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू झाली होती. सायंकाळच्या सुमारास पावसाने जोर धरल्यामुळे मंडळांमध्ये भाविकांची तुरळक गर्दी दिसून आली. नवीपेठेतील यात्रोत्सवावर परिणाम गणेशोत्सवानिमित्त नवीपेठेत यात्रा भरते. गत आठ दिवसात या परिसरात खाद्य पदार्थांसह विविध वस्तुंचे विक्रीचे स्टॉलवर भाविकांची गर्दी दिसून आली. शुक्रवारी मात्र पावसामुळे नवीपेठेतील स्टॉलवर एक-दोन ग्राहक दिसून आले. पावसाचा मोठा परिणाम या छोट्या आले. व्यावसायिकांवर झाल्याचे दिसून
आज होणार विसर्जन
लाडक्या बाप्पाला शनिवारी ६ रोजी निरोप दिला जात आहे. त्यानिमित्ताने विसर्जन मिरवणुकीसाठी मनपा प्रशासनासह पोलीस प्रशासनाने नियोजन केले आहे. शहरातील आठवडे बाजार शनिवारी बंद राहणार असून वाहनांना बंदी करण्यात आली आहे.
सात ठिकाणी मुर्ती संकलन केंद्र
जळगाव महानगरपालिकेने शहरात सात ठिकाणी गणेश मूर्ती संकलनाची केंद्र तयार केले आहेत. यात महानगरपालिका लाठी शाळा पंचमुखी हनुमान मंदिराजवळ, मनपा पांजरा पोळ शाळा जुने जळगाव, सागर पार्क, पिंप्राळा निमडी शाळा,
निमखेडी गट नंबर १०१ येथील पाण्याची उंच टाकी, नाभिक समाज सभागृह शिवाजीनगर, श्री साईबाबा मंदिर मेहरूण येथे मुर्ती संकलित करण्यात येणार आहे.
४५ जणांचे पथक
महानगरपालिकेने गणेश घाट येथे घरगुती मूर्ती व लहान मूर्ती विसर्जनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे या ठिकाणी एक जीव रक्षक बोट, ४५ व्यक्तींचे पथक, ५ लाकडी तराफ 1. प्रकाश व्यवस्था व बारागेटिंग व्यवस्था केलेली आहे. मेहरूण तलाव येथे मोठ्या मूर्ती विसर्जनासाठी सेंट टेरेसा हायस्कूल पासून पुढे तलावाच्या काठावर व्यवस्था उभारण्यात आलेली आहे. या ठिकाणी ५ तराफे, ४ क्रेन, २ राखीव क्रेन, ४५ कामगारांचे पथक, प्रकाश व्यवस्था केलेली आहे.