शुक्र ग्रह करणार गोचर : ‘या’ राशीच्या लोकांना बसणार आर्थिक फटका

तरुण भारत लाईव्ह । १८ मे २०२३ । प्रत्येक ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी बदल करतो. आता 30 मे 2023 रोजी शुक्र ग्रह मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करणार आहे. शुक्राच्या गोचरामुळे दोन राशीच्या जातकांना सावध राहावं लागणार आहे. 30 मे रोजी शुक्र ग्रह मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करेल. संध्याकाळी 7 वाजून 51 मिनिटांनी शुक्र कर्क राशीत प्रवेश करेल. या राशीत 6 जुलैपर्यंत राहील. त्यानंतर 7 जुलैला पहाटे 4 वाजून 28 मिनिटांनी सिंह राशीत प्रवेश करेल. तर कोणत्या आहेत त्या राशी जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

कर्क रास
या राशीच्या प्रथम भावात शुक्र गोचर करणार आहे. पण या राशीच्या चतुर्थ आणि एकादश भावाचा स्वामी शुक्र आहे. यामुळे निश्चितचं कर्क राशीच्या जातकांची आर्थिक स्थिती सुधारेल. त्यामुळे ही स्थिती हातळण्यासाठी सज्ज राहा. जोडीदारासोबत कोणताही वाद झाला तरी सामंजस्यपणे तो सोडवण्याचा प्रयत्न करा. नकारात्मक विचार दूर करा आणि चर्चेने प्रश्न सोडवा.

मकर रास 
या राशीच्या पाचव्या आणि दहाव्या स्थानाचा स्वामी शुक्र आहे. पण कर्क राशीत गोचर करताच सातव्या स्थानात स्थित असणार आहे. त्यामुळे या राशीच्या जातकांनाही वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात. पती पत्नीमध्ये वाद होऊ शकतात. त्यामुळे या काळात काळजी घ्या.