ज्येष्ठ अभिनेत्री रॅकेल वेल्च यांचे निधन; वयाच्या ८२व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

तरुण भारत लाईव्ह ।१६ फेब्रुवारी २०२३। लोकप्रिय हॉलिवूड अभिनेत्री रॅकेल वेल्च यांचे निधन झाले. वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. १९६० च्या दशकात त्यांनी त्यांच्या अभिनयाने अनेकांवर मोहिनी घातली होती.

हॉलिवूड मधून एक वाईट बातमी समोर येतेय, ज्येष्ठ अभिनेत्री रॅकेल वेल्च यांचे निधन झाले, त्या ८२ वर्षांच्या होत्या. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, रॅकेल वेल्च या अनेक दिवसांपासून आजारी होत्या आणि याच कारणामुळे त्यांचे निधन झाले. १९७४ साली आलेल्या ‘द थ्री मस्केटियर्स’ या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. आजही त्यांची ही आयकॉनिक भूमिका लोकप्रिय आहे. दरम्यान यासाठी त्यांना गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला होता. वेल्च केवळ अभिनेत्रीच नव्हे तर गायिकाही होत्या. त्यांंनी लास वेगासमधील वन वुमन नाइट क्लबमध्येही अनेक अभिनय केले.

रॅकेल यांना ६० आणि ७० च्या दशकातील आयकॉन मानले जायचे. त्यांनी गोल्डन ग्लोब पुरस्कारावरही नाव कोरले. वेल्च यांनी त्यांच्या कारकिर्दीत ३० हून अधिक सिनेमात केले. ‘वन मिलियन इयर्स बीसी’ चित्रपटात त्यांचे केवळ तीन ओळींचे संवाद होते. मात्र अभिनेत्रीने परिधान केलेल्या बिकिनीचे फोटो त्या काळातील सर्वाधिक विक्री झालेल्या पोस्टर्सपैकी एक ठरले होते. दरम्यान वेल्च यांच्या जाण्याने हॉलिवूडचे न भरून निघणारे नुकसान झाले. अभिनेत्रीला ट्विटरद्वारे श्रद्धांजली अर्पण केली जातेय.