ज्येष्ठ पत्रकार अनिल केर्‍हाळे यांचे निधन

तरुण भारत लाईव्ह । जळगाव : अभाविपचे पूर्व कार्यकर्ते, टीव्ही नाईन न्यूजचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी अनिल दत्तू केर्‍हाळे यांचे ९ मे रोजी पहाटे पावणेदोनला उपचार सुरू असताना निधन झाले.

 

टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीचे जिल्हा प्रतिनिधी तथा ज्येष्ठ पत्रकार असलेले अनिल केर्‍हाळे अतिशय दुर्धर अशा व्याधीतून बरे झाले होते. तथापि, काही दिवसांपूर्वी पुन्हा त्यांची प्रकृती खराब झाल्याने त्यांना मुंबई येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना त्यांनी पहाटे शेवटचा श्वास घेतला.

त्यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमातून अतिशय चमकदार कामगिरी बजावली होती. वृत्तवाहिनींमधील जिल्ह्यातील आघाडीचे पत्रकार म्हणून त्यांची ख्याती होती. अनिल केर्‍हाळे यांच्या अकाली मृत्यूमुळे पत्रकारितेसह राजकीय, सामाजिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.