संभाजीनगर येथील खुलताबाद परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक 23 वर्षीय तरुणी कारमध्ये बसून रिल्स बनवत असताना अचानक कार दरीत कोसळली. या घटनेत तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. दौलताबाद परिसरात असणाऱ्या सूलीभंजन येथील दत्त मंदिराजवळ १७ रोजी ही घटना घडली असून, या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सुलीभंजन येथील दत्त मंदिराराचा परिसर विहंगम असून, पावसाळ्यात तो निसर्ग सौंदर्यांने अधिक खुलतो. त्यामुळे भाविक , पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. अशातच श्नेता आणि तिचा मित्र शिवराज संजय मुळे (वय 25 रा.हनुमान नगर) हे दोघेजण गुरुवार, 17 रोजी फिरायला आले.
या ठिकाणी मोबाईलवर रिल्स बनवतांना तिने मित्राला सांगितले की, मी पण कार चालवून बघते. रिव्हर्स गिअर पडून, एक्सलेटरवर दाब पडल्याने कार थेट डोंगरावरुन खाली गेली, यामध्ये या युवतीचा मृत्यू झाला. तसेच कारही चक्काचूर झाली. दरम्यान, मंदिर परिसरातील या सौंदर्य निरीक्षण स्थळावर कठडे असते तर ही घटना घडली नसती अशी चर्चा होती. तसेच नवीन ठिकाणी जाऊन डोंगराच्याकडेला कार रिव्हर्समध्ये टाकणं म्हणजे मृत्यूला निमंत्रण देण्यासारखंच आहे, जे दुर्दैवानं श्वेताच्या बाबतीत खरं ठरलं.