VIDEO : नवी मुंबईतील केमिकल कंपनीला भीषण आग, परिसरात भीतीचे वातावरण

नवी मुंबई । नवी मुंबईतील एका केमिकल कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना समोर आली असून या आगीच्या घटनेने एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 10 हून अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या व्हिडीओमध्ये ज्वाला आणि धुरामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील एमआयडीसी परिसरात असलेल्या केमिकल फॅक्टरीत मंगळवार 2 एप्रिल रोजी सकाळी अचानक आग लागली. आगीच्या घटनेने आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्वत्र गोंधळाचे वातावरण दिसत होते. काही लोकांनी तत्काळ अग्निशमन दलाला माहिती दिली. तर काही लोकांनी आपापल्या स्तरावर आग विझवण्यास सुरुवात केली.


अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी तातडीने आग विझवण्याचे काम सुरू केले. या घटनेत काही लोक जखमीही झाल्याचं सांगण्यात येत आहे. या जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

कारखान्याजवळील एका व्यावसायिकाच्या इमारतीत ही आग लागली आणि तिथून कारखान्यालाही आग लागल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. दफ्तरी रोडवरील सेंट्रल प्लाझाच्या पाचव्या आणि सहाव्या मजल्यावरील काही दुकानांना ही आग लागली होती.

व्हिडिओ समोर आला