Video : भारतीय असावा… बायकोने खूप थांबवण्याचा प्रयत्न केला, हारिस रऊफ आणि चाहत्यामध्ये हमरीतुमरी

टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत साखळीत आव्हान संपुष्टात आलेल्या पाक संघावर चोहोबाजूने टीका होत आहे. चाहते मिळतील तिथे त्यांना डिवचण्याची संधी सोडत नाहीय. असाच काहीसा प्रकार वेगवान गोलंदाज हारिस रऊफसोबत घडला. हारिस रऊफ आपल्या पत्नीसोबत कुठेतरी जात असल्याचं व्हायरल व्हिडीओत दिसत आहे. त्यावेळी त्याचं एका चाहत्यासोबत भांडण झालं.  यावेळी त्याची पत्नी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत आहे, इतर काही लोकही त्याला रोखण्याचा प्रयत्न करत आहेत पण हरिस हे मान्य करत नाही. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओबाबत अशी चर्चा रंगली आहे की, हारिस रऊफ हॉटेल जवळ पत्नीसोबत फिरत होता. तेव्हा तिथे काही क्रिकेट चाहते होते. यावेळी त्याने हारिस रऊफवर काहीतरी कमेंट केली. त्यानंतर हारिस रऊफ अंगावर धावत गेला. त्याला त्याच्या पत्नीने रोखण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण तिला बाजूला ढकलून चप्पल काढून चाहत्यांपर्यंत जातो. चाहत्याने नेमकं काय सांगितलं हे कळू शकलेलं नाही. पण हारिस रऊफने सांगितलं की, तू तुझ्या बापाला शिव्या देत आहेस. तिथे इतरही काही लोकं होते. हारिस त्या चाहत्यापर्यंत पोहोचायच्या आधीच त्याला त्यांनी पकडलं. तेव्हा हारिस रऊफ बोलतो की, हा भारतीय असेल.

हारिस रऊफच्या भारतीय असल्याच्या टीकेनंतर चाहत्याची तळपायची आग मस्तकात जाते. पुढे येतो आणि स्पष्टच सांगतो की, मी पाकिस्तानीच आहे. त्यावर हारिस रऊस सांगतो की, तुला तुझ्या वडिलांनी हेच शिकवलं आहे. अमेरिकेविरुद्ध शून्यावर बाद झाल्यानंतर आझम खानही चाहत्यांच्या निशाण्यावर आला होता. इतकंच काय तर आझम खान चाहत्याला भिडला होता. दुसरीकडे, मोहम्मद आमिरलाही भर मैदानात फिक्सर म्हणून चाहत्याने डिवचलं होतं.

 हरिस रऊफला का आला राग ?

पाकिस्तानचे चाहते आपल्या देशातील खेळाडूंमुळे निराश झाले आहेत. टी-20 विश्वचषकाच्या सुपर-8 फेरीपर्यंतही संघ पोहोचू शकला नाही. पहिल्या सामन्यात अमेरिकेकडून पराभव पत्करावा लागला. यानंतर टीम इंडियाने पराभव केला. यासह पाकिस्तानी संघ टी-20 विश्वचषकातून बाद झाला. या पराभवानंतर त्यांचे खेळाडू सुट्ट्या साजरे करत असल्याने पाकिस्तानी चाहतेही संतापले आहेत, या खेळाडूंना पराभवाची खंत वाटत नाही. त्यामुळेच चाहते आपल्या देशाच्या खेळाडूंना पाहताच त्यांच्यावर अशा पद्धतीने कमेंट करत आहेत की त्यामुळे वाद निर्माण होत आहेत.

रऊफ पाकिस्तानी संघातून बाद होऊ शकतो
टी-20 विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर आता अनेक खेळाडू पाकिस्तानी संघातून बाहेर जाऊ शकतात. यामध्ये हरिस रऊफच्या नावाचाही उल्लेख केला जात आहे. यामध्ये शादाब खान, आझम खान यांचाही समावेश आहे. मात्र, त्याआधीच हरीस रऊफने वाद करून स्वतःची डोकेदुखी वाढवली आहे. आता हरिसचे काय होते ते पाहायचे आहे.