Video : राऊत आणि संजय शिरसाट आमनेसामने, पहा काय घडलं

मुंबई: मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सात वर्षानंतर छत्रपती संभाजीनगरात राज्य मंत्रीमंडळाची बैठक झाली. यासाठी अनेक नेते छत्रपती संभाजीनगर येथे आले आहेत. ॲम्बेसेडर हॅाटेलच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट आमने-सामने आल्याचे पहायला मिळाले. कॅमेऱ्यासमोर एकमेकांवर जहरी टीका करणारे हे दोन्ही नेते जेव्हा समोरा-समोर आले तेव्हा दोघांनी हसून हस्तांदोलन करत एकमेकांचे स्वागत केले.
संजय राऊत हे गाडीतून उतरताच त्यांच्या समोर संजय शिरसाट दिसले. तेव्हा दोघांनी एकमेकांना हस्तांदोलन केले. हे दोघेही नेते केवळ काही क्षणच एकमेकांसोबत होते. त्यानंतर दोघेही पुढे निघाले. मात्र हे दोघे अचानक एकमेकांसमोर आल्यानंतर दोघांनी हसून एकमेकांना हस्तांदोलन केले. यामुळे त्यांच्या या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
खासदार संजय राऊत गाडीतून उतरले त्या वेळी संजय शिरसाट गाडीची प्रतीक्षा करत असल्याचे या व्हीडिओमध्ये दिसून येते. गाडीतून उतरताच संजय राऊत हे संजय शिरसाट यांना आवाज देतात. त्याला संजय सिरसाट देखील तेवढ्याच आनंतदाने उत्तर देत असल्याचे यात दिसून येते.